मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा

वरुण मोहिते · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
aaaaaa आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा . मी असतो तर स्वतःच उपोषणाला बसलो असतो पण आज पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. तितक्यात नवीन नोटेवर प्रतिमेसह चष्माही आलाय आणि देश गांधींच्या मूल्यांवर चालणारा आहे असा आवाज आला आणि मोहनदास हताश होऊन चालायला लागला.

वाचने 1527 वाचनखूण प्रतिक्रिया 1