मी (गंभीर) मराठी
मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा
प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही.
मिसळपाव
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.