Skip to main content

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 17/07/2014 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-) मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल.

<बुकी स्टॉल >

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/07/2014 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची संप्रेरणा http://misalpav.com/node/28254 समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 02/07/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 01/07/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे? तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.” बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

मदत हवी आहे..जर्मनी...

लेखक vrushali n यांनी शनिवार, 07/06/2014 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझी लहान बहीण २९ जुन ते २९ जुले ह्या कालावधीत कंपनी तर्फे stuttgart जर्मनीत प्रोजेक्ट साठी जातेय्.त्यासाठी काही महिती हवि आहे,जसे की काय काळजी घ्यावी,तिथे आजुबाजुला काय काय फिरन्यासरखी ठीकाणे आहेत, आणी कही सुचना असल्यास जरुर सांगाव्यात. आभारी आहे

मिपाकरांच्या आशीर्वादाने...

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 30/05/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो... मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ.

इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 13/04/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत अकौंट hack होणे मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात ) NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही) आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा (जुन्या लोकांना बँकेत गे

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 09/04/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 03/03/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही. तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्‍यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात. काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५