Skip to main content

मदत

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 01/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 28/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे.

खुलता खुळी खुलेना...

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

लेखक निनाद यांनी सोमवार, 19/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.

लेखक सई कोडोलीकर यांनी शुक्रवार, 19/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेकर मित्र मैत्रिणिंनो, दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे. २३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही. ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा.

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 07/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू?

अकोला आणि अमरावतीचे कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्‍यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे. आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे. तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का? ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम. कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच. आपलाच, मुवि.

... काय म्हणतील!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 14/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 11/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख