शिवजयंती विशेष लेख - शिवकालीन शस्त्रभांडार
शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं.
आयटीच्या गोष्टी - नमन
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही.
उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...
मित्रांनो,
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला.
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.
आणखी एक टायटॅनिक
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती...
दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही.
रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे.
डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.
एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)
संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो.
सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो.
क्यू. आर. कोड - म्हणजे काय रे भाऊ ?
मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि "बघू...", असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा 'वेब - चेक इन' केलेला बोर्डिंग पास दिसू लागला.
हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग ३
भारत देशात अभिजात संगीताच्या दोन शैली प्रामुख्याने आढळतात. त्यात हिन्दुस्थानी शैली व कर्नाटक शैली असे दोन प्रकार आहेत.वापरले जाणारे ताल, साथीसंगतीची वाद्ये व सादरीकरण ( यात आवाजाचा लगाव,. तान क्रिया ई चा समावेश ) यात मूलभूत फरक आहे. रागांचे वर्गीकरण करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. पण या गुंतागुन्तीच्या विषयात आपल्याला शिरायचे नाही.कारण ऐकले तर आवडते पण का आवडते हे समजत नाही अशी अवस्था असलेल्या रसिकाला समोर ठेवून ही मालिका लिहिली जात आहे.
हिंद्र्स्थानी अभिजात संगीतात घराणी नावाचा एक प्रकार आहे. त्या बद्द्ल एवढेच आपण समजून घ्यायचे आहे की घ्रराणे म्हणजे सादरीकरणाची शैली.
मिसळपाव
***