Skip to main content

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते. हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लेखक लिलि काळे यांनी बुधवार, 27/02/2013 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे.

3D प्रिंटींग - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 27/02/2013 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा एका मेल मधून 3D प्रिंटींगच्या व्हिडियोची एक मेल आली होती. ती बघितल्यावर काहीतरी गीमीक असावे म्हणून तिकडे लक्ष दिले नव्हते. पण परवा ही बातमी वाचली आणि हबकलोच. त्यावेळी तो व्हिडियो बघून त्या 3D प्रिंटींगला सीरियसली न घेतल्याबद्दल मन खाऊ लागले आणि 3D प्रिंटींगबद्दल ज्ञान वाढविण्यासाठी त्याची माहिती घेणे चालू केले.

आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

लेखक धन्या यांनी रविवार, 24/02/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीच्या गोष्टी - नमन आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते.

"शत्रुघ्न"च्या निमित्ताने

लेखक शरद यांनी शनिवार, 23/02/2013 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता.

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

शनिवारवाडा (भाग १) : इतिहास

लेखक सव्यसाची यांनी गुरुवार, 21/02/2013 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी ग.ह.खरे लिखित 'शनिवारवाडा' हे पुस्तक वाचनात आले. शनिवारवाड्याची कादंबऱ्यांमधून केलेली वर्णने त्या लेखकांनी कुठून मिळवली हा एक प्रश्न मला सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळाले. ग.ह.खरे यांनी पेशवे दफ्तरातील सात रुमाल वाचून शनिवारवाड्यावरील हे पुस्तक तयार केले होते. त्यांच्यानुसार हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुस्तकात इतिहास आणि अवशेष वर्णन यांचा समावेश आहे.

आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

लेखक धन्या यांनी मंगळवार, 19/02/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीच्या गोष्टी - नमन कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता.

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 19/02/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
न पुसला जाणारा कलंक! १९३९-१९४५ गॅसचेंबरकडे.............. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आजकाल पहाट शत्रू म्हणूनच उजाडते. असे वाटते की उगवणारर्‍या सूर्याने आमच्या विध्वंसासाठी आमच्या शत्रूशी हातमिळवणी केली आहे की काय ! - प्रायमो लेव्ही – "If this is a man" या पुस्तकात १९४६ मधे.