Skip to main content

भूक

लेखक शुचि यांनी गुरुवार, 27/12/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींबरोबर ऐश करुन, पोटाला तडस लागेल इतकं खाऊन, ४-४ सिनेमे पाहून कंटाळा आला आहे. फेसबुकावर वांझोट्या चर्चा करुनदेखील आणि कविता, चित्रे लाईक करुन करुन देखील कंटाळा आल आहे. बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून झाले आहे. मागे वळून पहाता फक्त स्वार्थ दिसतो कुरुप हाव दिसते. न संपणारी खरेदी दिसते आणि वखवख दिसते आयुष्यात. उपरती झाली आहे म्हणा ना : ( मुद्द्यावर येते - जर भारतातील एखाद्या संस्थेला मदत करायची असेल तर कशी आणि कोणत्या संस्थेला करावी? भूक हा मुद्दा अथवा अनाथाश्रमास मदत करायची झाल्यास कोणास व कसा संपर्क साधावा? भारतात असताना रोज पोळी-भाजी घेऊनच बाहेर पडत असे.

ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 16/12/2012 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्‍याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता.

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

लेखक जहीर सय्यद यांनी मंगळवार, 11/12/2012 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे.

दादला न लगे मला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/12/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला दादला नलगे बाई ! (1) सत्वर पाव गे मला ! भवानिआई रोडगा वाहिन तुला ! सासरा माझा गांवीं गेला ! तिकडेच खपवी त्याला ! ! सासू माझी जाच करती! लवकर निर्दाळी तिला जाऊ माझी फडफड बोलती ! बोडकी कर ग तिला ! नणंदेचे पोर किरकिर करिते ! खरूज होऊं दे त्याला ! दादला मारून आहुती देइन ! मोकळी कर ग मला ! एका जनार्दनी सगळेचि जाऊं दे ! एकटीच राहूं दे मला (2) मोडकेसें घर तुटकेसें छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नलगे बाई ! फाटकेच लुगडें तुटकीसी चोळी ! शिवाया दोरा नाही ! जोंधळ्याची भाकर आम्बाड्याची भाजी ! वर तेलाची धार नाही ! मोडका पलंग तुटकीसी नवार ! नरम बिछाना नाही ! सुरतीचे मोती गुळघाव सोने !

आस्थेचे बंध

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 05/12/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल. हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?

ओरिगामी प्रदर्शन

लेखक सुधांशुनूलकर यांनी मंगळवार, 04/12/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नमः || ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे मुंबईमध्ये ‘वंडरफोल्ड २०१२’ हे वार्षिक ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. शुक्रवार, ७ डिसेंबर ते सोमवार, १० डिसेंबर या चार दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला येण्याचं समस्त मिपाकरांना आग्रहाचं वैयक्तिक निमंत्रण. . प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील.