Skip to main content

कबुतरे............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/10/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतरांचा उपयोग. असाही..... बर्‍याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली.

सर्वोच्च झेप

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 09/10/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.

काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

शिवरायांची शस्त्रे व संभाजी महाराजांचे साहित्य

लेखक मालोजीराव यांनी रविवार, 30/09/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.

कताई शास्त्र ७

लेखक बापू मामा यांनी गुरुवार, 27/09/2012 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.

कताई शास्त्र ६

लेखक बापू मामा यांनी मंगळवार, 25/09/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
. कापूस एक नैसर्गिक वनस्पतीज तंतू असुन त्याचे वातानुकुलन व शोषकता हे गुणधर्म इतर कोणत्याही तंतूंना नाहीत. कापसाच्या पेशीत ८०-९०% सेल्युलोज, ८-९% पाणी,व उरलेले प्रथिन्,वॅक्स असते.कापसाचा तंतूचा क्रॉस सेक्शन एखाद्या पाईप प्रमाणे दिसतो. समजा त्या पाईपच्या भिंतींची जाडी (wall thickness) जास्त (म्हणजेच जर आतिल पोकळ भाग कमी असेल) तर तो परिपक्व(mature) व कमी असेल तर अपरिपक्व(immature) आहे असे समजतात. परिपक्व कापसाचे बल, लकाकी जास्त असते व पुढील प्रक्रियांमध्ये सुरळीत चालते.

[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा

लेखक पुष्कर जोशी यांनी शनिवार, 22/09/2012 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी BSNL Brodband ४-५ वर्षा पासून वापरीत आहे... माझ्याकडे Type 1 मोडेम आहे ... साधारण महिन्या पूर्वी मोडेम चे अडाप्टर जळले ... ठीक आहे ना इतके वर्ष चालले बरेच आहे .... मग मी BSNL च्या कार्यालयात गेलो म्हटले कि original घ्यावे त्रास नको .. तर तिथे कळले कि आता हे लोक मोडेम विकतच नाहीत ते सरळ म्हणाले कि बाजारातून घ्या ... बाजारात शोध घेतल्यावर कळले कि अडप्टर सामान्य नाही जरा वेगळे आहे 10 V 550 mA .. त्यामुळे मला चटकन मिळेना ... आणि ब्रांडेड तर नाहीच नाही .... मग आठवले कि आपल्या कडे जुनी सोल्ड्रिंग गन आहे आपण कोणे एके काळी electronics चे विद्यार्थी होतो ..