Skip to main content

बौद्ध दर्शन

लेखक शरद यांनी रविवार, 06/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
बौद्ध दर्शन खरे म्हणजे दर्शने हा काही वाचकप्रिय होण्यासारखा विषय नव्हे. त्या करिता एखादी जुनी, आपल्याला आवडलेली कविता घ्यावी, त्यात आपल्याला काय "भावले" सांगावे, मिपाकर (बहुधा पहिल्यांदीच वाचत असल्यामुळे असेल म्हणा वा सज्जन आहेत म्हणूम म्हणा !) "छान" म्हणतात, आपुन तरी खुष. दर्शनांचे तसे नाही. तो माझ्या आवडीचा विषय. पण डोके खाणारा. तेव्हा सुरवातीला विचार केला " लिहून तर बघू, १०० जंणांनी वाचला तर पुढे जावू, नाही तर दिले सोडून. सुरवातीचा प्रतिसाद सुखकारक वाटला म्हणून "तंत्रा" पर्यंत लिहले व थांबलो. थोडक्यात गोडी, एवढे नक्की कळते. नंतर आमचे मित्र श्री.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

लेखक मोग्याम्बो यांनी शुक्रवार, 04/09/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
Avengers: Age of Ultron ह्या बहुचर्चित चित्रपटाने जगातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट निर्मिती करणारी Marvel Studio ही संस्था सगळ्यांना परिचित आहे. Comic Books मधील पात्रांवर चित्रपट तयार करण्यामध्ये ही सध्या अग्रगण्य आहे. पण ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरी जाहीर करणार होती असे म्हटले तर? Marvel Comics सन १९३९ साली स्थापन झाली. तिचा पहिला वहिला मालक होता "मार्टिन गुडमन". पण Marvel ला २००५ साल येईपर्यंत कधीच स्थैर्य लाभले नाही. त्याचे कारण म्हणजे प्रत्यके गोष्टीमध्ये ते DC Comics च्या मागेच राहिले. "ह्युमन टोर्च " आणि "नेमोर" ह्या दोन पात्रांनी मार्वेल कॉमिक्स ची सुरवात झाली.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

आंतरजाल : काय लिहावे काय लिहू नये...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/09/2015 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
सद्याच्या आंतरजालक्रांतीच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या जगात सामजिक माध्यमांनी सर्वसामान्य माणसांला सार्वजनिक स्तरावर व्यक्त होण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. ही संधी एक दुधारी धार असलेले शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. आंतरजालावरच्या मिसळपावसारख्या मुक्त संस्थळांवर वापरलेल्या व्यक्तीगत गैर टिप्पणींमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या / समाजगटाच्या श्रद्धास्थानावर केलेल्या गैर टिप्पणींमुळे ही संधी नकळत कायदेशीर अपराधामध्ये परावर्तीत होवू शकते. त्यामुळे लेख आणि प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व लेखकांनी ही संधी जबाबदारीने वापरण्याची जरूरी आहे याबाबत दुमत नाही.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. 

१. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) 

२. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) 

श्रीमन्महाभारत -उपसंहार

लेखक शरद यांनी शनिवार, 29/08/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमन्महाभारत - उपसंहार प्रत्येक गोष्टीला लोकप्रिय होण्यास तिचा काळ यावा लागतो. उदा. मुंबईतला लालबागचा राजा, सिद्धीविनायक, पुण्यातील दगडुशेट गणपती वा शिर्डीचे साईबाबांचे मंदीर. आजकाल मिपावर चलती आहे "महाभारता"ची चांगली गोष्ट. चार लोक महाभारत वाचणार असतील, त्यातही संपूर्ण (अर्थात मराठी भाषांतर) तर सोन्याला सुगंधच. शिवाय भागवत-कर्वे-कुरुंदकर सोबतीला असतील तर वा-ह-वा ! आज मी यांच्या जोडीला आणखी एका विद्वानाच्या पुस्तकाची भर घालू इच्छितो. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या "श्रीमन्महाभारत-उपसंहार" या अमूल्य खंडाची.

बहिण भावाच्या अतुट प्रेमाचा सण राखी पोर्णिमा

लेखक हेमंत लाटकर यांनी शनिवार, 29/08/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
राखी पोर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या (जर सख्खा भाऊ नसेल तर नात्यातील भावाच्या) हातावर राखी बांधावी. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करते.

फिरकी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 26/08/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला. नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) . तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.