Skip to main content

मक्केतील उठाव १

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 25/09/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.

मोहिम-ए-संपादक

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 22/09/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 21/09/2016 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे. विचारलंत ना? घ्या आता!

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

लेखक निनाद यांनी सोमवार, 19/09/2016 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच.

व्हाटसॅप समुह - वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, पुराणे, धार्मिक कथा, सणवार, प्राचीन भारतीय विज्ञान आदि विषयांवर चर्चा या साठी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/09/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह http://www.misalpav.com/node/36333 आणि सायकल समुह http://www.misalpav.com/node/33936 असे दोन समुह अतिशय उत्तम रितीने चालले आहेत. दोन्हीकडे विषयाशी संबंधित नसलेले कोणतेही फॉरवर्डस पाठवण्यास बंदी आहेत. आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे! अनेक सदस्यांनी समुहांच्या शिस्ती विषयी अगत्याने कळवले आहे. या नंतर फक्त धार्मिक तसेच आशावादी विषयाला वाहिलेला समुह तयार केला आहे.

कावेलोसिम - स्वप्नातले गांव

लेखक गणामास्तर यांनी बुधवार, 14/09/2016 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं. प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

काय, कधी कुठे? - अमेरिका

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 27/08/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!

रणथंभोर ची राणी

लेखक लोनली प्लॅनेट यांनी रविवार, 21/08/2016 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
राजस्थान मधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान १९९७ चा जुलै महिना, जंगलातील एका भागात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला, हि अतिशय आनंदाची घटना पाहण्यासाठी भारतीय व्याघ्र तज्ज्ञ डॉ वाल्मिक थापर व आयरिश माहितीपट निर्माता कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन हे दोघे गेले होते, त्यांनी पहिले कि तिन्ही बछडे मादी आहेत. काही दिवस त्यांनी बछड्यांचे निरीक्षण केले, तेंव्हा त्यांना दिसले कि एक मादी बछडा इतर दोन बछड्यांपेक्षा जास्त आक्रमक व खेळकर आहे. त्यांनी पहिले कि तिच्या चेहेऱ्यावर एक माशाच्या आकाराचा पट्टा आहे , कॉलिन नि वाल्मिक थापर ना विचारले FISH ला हिंदीतून काय म्हणतात ?