Skip to main content

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 03/10/2016 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी- दीपशिखा दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा . जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे.

मक्केतील उठाव २

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 02/10/2016 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग इस्लाम स्थापन झाल्यापासून किंबहुना त्याआधीही मक्का हे शहर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुसलमानाला अशी धर्माज्ञा असते की आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करतोच. सौदी अरेबियाकरता मक्का हे एक प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील मुस्लिमांनी पवित्र मानलेल्या जागेची व्यवस्था बघण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे हे त्यांचे ते कर्तव्य मानतात. अर्थात ह्या यात्रेमुळे सौदी सरकारला मोठा महसूलही मिळतो.

दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 02/10/2016 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी- दीपशिखा दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस . पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, ट्रेनमध्ये एकटी बाई बघून लुटले आणि चालत्या गाडीतून ढकलून दिले. आपण हळहळतो, चुकचुकतो.आजकाल साधं जगणंही कसं सगळं अनसेफ झालंय अशा चर्चा करतो आणि पेपरचे दुसरे पान उघडत अजून एक चहा पितो.

दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 01/10/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधी- दीपशिखा . इस्टर्न व्हेनिस नावाने प्रसिध्द असलेल्या अलापुडा ह्या केरळमधल्या निसर्गरम्य गावामध्ये, एका रोमन कॅथोलिक कुटुंबात टेसीचा एप्रिल १९६४ मध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटिज मध्येही ती उत्साहाने भाग घेत असे आणि बक्षिसे, ट्रॉफीज,कप्सही जिंकून आणत असे. उत्तम बॅडमिंटन खेळणार्‍या टेसीला आपण बॅडमिंटन चँपियन व्हावे असेही वाटत असे.

दीपशिखा!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 30/09/2016 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत.

पाश्चिमात्य साहित्य

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 27/09/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते.