मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे.
तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.
मिसळपाव
शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले.
जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.