Skip to main content

लेख

आयुर्वृद्धितीतली सुंदरता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/08/2009 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची.तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, "तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस." "पण तू इतकी खराब कशी झालीस?. असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली, "अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?" मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच

अतुलचा भयगंड

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 21/08/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. "ह्याचं पुढे कसं होणार?" ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, "जसा तो मोठा होईल तसा सुधारेल" अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे, "तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल." इतर मुलांच्याबरोबरी

आमच्या गावचा पोळा

लेखक अनामिक यांनी गुरुवार, 20/08/2009 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो जालावरून साभार आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.

स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

लेखक मन यांनी मंगळवार, 18/08/2009 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपुन मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं ...श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह. वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह.

या सुखानो या!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 17/08/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.

डुक्करताप, मी अन घबराट

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 16/08/2009 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला. "इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 15/08/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
"जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते." अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती.मला त्यांच्या कविता फारच आवडतात.

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/08/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे. आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल.