Skip to main content

लेख

वेदना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 06/08/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपनाबाजारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, "वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो." जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.

भाषा - काही अप काही डाउन

लेखक सुनील यांनी मंगळवार, 04/08/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक - बहुगुणी यांच्या एका लेखावरून मनात आलेले काही स्वैर विचार.... आपल्या लोकसंगीताच्या खाणीतील काही हिरे-माणके हिंदी चित्रपटगीतांत आणून बंगाली संगीतकारांनी दोन गोष्टी केल्या. एक हिंदी सिनेसंगीत अधिक समृद्ध केले आणि दुसरे म्हणजे, ह्या बंगाली खजिन्याची ओळख उर्वरीत देशवासीयांना करून दिली. ह्यातील दुसर्‍या गोष्टीचे मला अधिक अपृप वाटते. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले त्याचबरोबर अनेक बंगाली कथा-कादंबर्‍यांची विविध भारतीय भाषांत रुपांतरेदेखिल झाली. परंतु, संगीताचा प्रभाव हा अधिक असतो, समाजातील सर्व स्तरांत झिरपणारा असतो. नेमके हेच बंगाली संगीतकारांमुळे घडले.

शरदाचं चांदणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/08/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
गांवाला आमच्या शेजारीच शरदचं घर होतं आणि त्याच्या शेजारी त्याच्या काकांचं घर होतं.आम्ही सर्व मुलं त्याच्या काकांच्या घरी खेळायला जायचो.हे मला पक्कं आठवतं. शरदची राहणी अगदी साधी पण विचारसरणी मात्र उच्च होती.त्यावेळी त्याच्या सहवासात असतानाच त्याच्या ह्या वृत्तीचा मला पडताळा आला होता.शरद मुळातच गरीब स्वभावाचा होता.दुसर्‍याच्या भावना आपल्या कडून दुखवल्या जाऊं नयेत म्हणून तो पराकाष्टा करायचा हे माझ्या नजरेतून चूकलं नव्हतं. आता मला भेटला तेव्हा मला आमच्या बालपणाची आठवण प्रकर्शाने जाणवली. मी शरदला म्हणालो, "मी माझ्या लहानपणी तुझ्याकडून खूप शिकत होतो.

तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 31/07/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

मग ओबामा निराळे कसे?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 28/07/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मिसळ-पाव"वरील, त्यातही अमेरिकास्थित, मित्र-मैत्रिणींनो, कृपया खालील लिंक उघडून माझा ई-सकाळच्या वेब एडिशनवर कालच प्रसिद्ध झालेला ले़ख वाचावा व माझ्या मतांशी सहमती असल्यास 'व्हाईट हाऊस', १६०० पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी. सी.