Skip to main content

लेख

गुगल क्रोम - काय असेल ?

लेखक वाचक यांनी मंगळवार, 28/07/2009 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
'क्रोम' गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अ‍ॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :) गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकांसाठी आहे.

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 27/07/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?” आहे. “महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“ असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो. “महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “ हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.

मटाची सांगितिक दिवाळखोरी...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/07/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामध्ये स्वर्गीय भास्कर चांदावरकर यांच्याविषयी अग्रलेख आहे. मात्र त्यात त्यांच्या काही गाण्यांचा उल्लेख करतांना मटा संपादकांनी भावनेच्या भरात एक घोडचूक केली आहे.. सुरेश भट साहेबांचं 'उष:काल होता होता..' हे गाणं भास्कर चंदावरकरांचं आहे असा त्यात उल्लेख आहे. वास्तविक हे गाणं चंदावरकरांचं नसून पं हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं! मटाचा जाहीर निषेध.. आपला, (हृदयनाथप्रेमी) तात्या.

लांडगे आले रे .... आणि परत गेले

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 27/07/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
बावीस जुलैला सूर्याला लागलेले खग्रास ग्रहण शंभर वर्षातले सर्वात मोठे होते, तसेच चोवीस जुलैला मुंबईच्या समुद्राला शंभर वर्षातली सर्वात मोठी भरती आली होती असे त्या त्या विषयांमधले तज्ज्ञ सांगतात. या दोन्ही गोष्टी आपल्या छोट्या आयुष्यात आपल्याला पहायला मिळाव्यात हे आपले केवढे मोठे भाग्य? असे वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, लेख आणि चर्चा वगैरे गोष्टी गेल्या तीन चार महिन्यांपासून सर्व प्रसारमाध्यमांवर येऊ लागल्या होत्या. हळू हळू त्यांची संख्या वाढत गेली आणि तमाम जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्कंठा निर्माण करून ती पध्दतशीरपणे वाढवत नेली गेली.

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

"बट-शेवंतीची फुलझाडं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/07/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे,आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची. मी कर्णिकांना म्हणालो, "हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?" मला दादा कर्णिक म्हणाले, "गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-reality

दोन दिवसांचा चांगला ट्रेक - वा़की -शेवत्या घाट - केळद - मढेघाट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 22/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे, एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत. केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत. १. उपांड्याची नाळ, २. शेवत्या घाट आणि तिसरी ३. मढेघाट, पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो.