चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपुन मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं ...श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह.
वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान्-मोठे ,डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज.
अशाच वेळी जाताना मनोबाला दिसलं कुणीसं रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षाखाली बसलेलं....
एक शांतचित्त प्रसन्नमुख दाढीधारी शुभ्र व्यक्तिमत्व. मनोबा सहजच तिकडं ओढला गेला.
त्यानं मनोबाला गंभीर्,पण प्रसन्न आवाजात विचारलं "कुठं चाललात मनोबा? कुठुन येताय? "
"झेंडावंदनाहुन येतोय." लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानच तोंडात टाकत मनोबा पुढं म्हणाला:-
"आज भारताचा पन्नासावा स्वातंत्र्यदिन."
"म्हणजे नक्की काय?" नीट मनोबाकडं निरखत योग्यानं विचारलं.
"म्हणजे..म्हणजे बरोब्बर पन्नास वर्षापुर्वी ....
१)ह्याच दिवशी परकिय राज्यकर्ते देश सोडुन गेले. आणि-----
२)देश स्वतंत्र झाला." मनोबानं फाटकन् आत्ताच ऐकलेल्या भाषणातलं उत्तर दिलं.
"ह्यातलं पहिलं पुर्ण अचुक. पण........"--योगी
"पण काय ?"-- डाव्या बाहीनं नाक पुसत, गोड शेंबुड गिळत निरागस पोर विचारतं झालं.
"दुसरं तितकसं बरोबर नाही."-- मोठ्ठे डोळे आकाशात लावत, आपल्याच तंद्रित योगी बोलला.
"म्हणजे?" मनोबा.
योगी काहिच न बोलता चालु लागला.आणि त्याच्या मागोमाग मनोबा!
थोडसं पुढं जाताच एक मोक्ळी जागा, छोटासं मैदान लागलं. एक मोकळा बैल तिथं फिरत होता.
"अरेच्चा! हा मोकळा असुनही गोल गोल का फिरतोय?"--चकित मनोबा.
"हा पुर्वी पासुनच घाण्याला जुंपला होता. नुकताच सोडवुन कुणीतरी आणलाय इथं.
सध्या त्याच्यावरची साखळी,दोरी घाणा ही बाह्य बंधनं काढुन टाकण्यात आली आहेत. "
"आणि म्हणुनच हा स्वतंत्र झालाय्...बरोब्बर??"खुश होत मनोबा वदला.
"तुच ठरव ते." गंभीर आवाजात बोलत योगी हळुहळु लुप्त झाला.
मनोबा दिङ् मूढ होत (मट्ठ बैलाबद्दल कुतुहलान विचार करत)लुप्त होणार्या तेजाकडं बघु लागला....
वाचने
2808
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
झकास
छान ! आवडली
"अरेच्चा!
लघुकथा
मस्त
गमतीदार
करेक्ट!
In reply to गमतीदार by धनंजय