लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.
मिसळपाव
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.
मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
मी आज असे म्हणायचे कारण म्हणजे नवी दिल्ली इथून माझ्या एका मित्राने या स्वप्न सुंदरीचा ई-मेल ने पाठविलेला फोटो. तसे आंतरजालावर मधुबालाचे शेकड्यांने फोटो उपलब्ध आहेत, पण त्याला अचानकच तेथील एका व्यक्तीच्या खाजगी संग्रहात हा फोटो मिळाला.