एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा
''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.
कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी.
मिसळपाव
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.