दि. १७ नोव्हेंबर, सिंह राशीतला उल्कावर्षाव!
नमस्कार मंडळी,
उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न!
उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते.
मिसळपाव