Skip to main content

लेख

पीस

लेखक विभावरीकाले यांनी शुक्रवार, 07/09/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रवाह कागडिया... सध्या मी एम. एल. ए असल्या मुळे तुम्हाला माझं बोलणं खरं वाटणार नाही. पण काही माणसाचं अजब असतात, जीवनात असल्या व्यक्तीं पेक्षा कितीही जास्त यश प्राप्त केलं, तरी तुम्हाला तुमच सर्व यश बेकार वाटतं आणि त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण किवां कदाचित इर्षा वाढतच असते. माझं बोलणं नाहीना कळाल? जो पर्यंत तुम्ही माझ्या मित्र सुज्ञाला नाही भेटणार, तुम्हाला माझी गोष्ट नाही कळणार... ... आज चौकातून जात असताना, मी माझी 'एस्टीम' गाडी सूज्ञाचा चाळी समोर थांबवली.. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस, दुपारी चारचा सुमार होता.

दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

लेखक पैसा यांनी रविवार, 02/09/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे. मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे. दै.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी

लेखक सागर यांनी शनिवार, 18/08/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.