Skip to main content

लेख

पाश - कथा - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 25/09/2015 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
"जन्या , ए जन्या , आरं ती रीळं आली का न्हाई अजुन ?" राजाभाउ आपल्या मदतनीसावर खेकसले . "न्हाई मालक . सदू गेलाय तालुक्याच्या गावाला , पन अजुन आला न्हाई" जन्याने उत्तर दिले . राजाभाउ चिंतेत पडले . त्यांचा फिरत्या टूरींग टॉकीजचा व्यवसाय होता. खेडेगावांमध्ये जत्रेच्या दिवसांमध्ये मोकळी जागा पाहुन ओपन एअर तंबु ठोकायचा आणी रात्री चित्रपटांचे खेळ दाखवायचे असे या व्यवसायाचे स्वरुप होते . चार बाजुंनी कापडाच्या भिंती , आतमध्ये एका टोकाला सिनेमाचा पडदा आणी दुसरया टोकाला प्रोजेक्टर . मधे प्रेक्षकांसाठी बसायला मोकळी जागा. त्यातही एक बाजु स्त्री प्रेक्षकांसाठी आणी दुसरी बाजु पुरुष प्रेक्षकांसाठी .

स्क्रिन शॉट भाग - ३

लेखक राजू यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

स्क्रिन शॉट भाग -२

लेखक राजू यांनी बुधवार, 23/09/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रिन शॉट भाग - २ आतापर्यंत..... असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली. पुढे चालु..... नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले. काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते.

स्क्रिन शॉट

लेखक राजू यांनी मंगळवार, 22/09/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
( विशेष सूचना- सदरील कथा व यातील व्यक्ति त्यांची नावे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. सोशल नेटवर्क म्हणजे सर्वप्रकारचे फोटो,व्हिडिओ, लिखाण,माहिती,मैत्री,वाद-विवाद यांचा अफाट महासागर असल्याने पुढील कथा कोणाला आपल्या जवळची वाटली तर तो योगायोग समजावा. ) अमितने नेहमी प्रमाणे सकाळचा नाष्टा झाल्यानंतर घरच्यांशी ठरल्याप्रमाणे रात्री बंद केलेला मोबाईल व त्यावरील डाटा फेसबुक,व्हाट्स अप वरील नोटिफिकेशन पाहण्यासाठी सुरु केला. अपेक्षे प्रमाणे सतत टिंग...टिंग येणाऱ्या आवाजाने तो सुखावला.

आपला दिनु( थोडं भय)

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 22/09/2015 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात स्वच्छ चांदणे पसरले होते, दिनू आज खूपच अस्वस्थ होता. आता तूम्हाला वाटल असेल की आपला दिनु का बरं अस्वस्थ होता अहो तस काही मोठ कारण नव्हत ! कालपासून त्याला थोडे जुलाब होत होते म्हणून आज सकाळीच बसने तो तालूक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात गेला होता दवाखान्यात खुपच गर्दि असल्यान खुप उशीरा त्याचा नंबर लागला इंजक्शन ,गोळ्या घेउन तो तातडीन स्टँडवर आला दुपारची तर बस निघुन गेली होती. आता उरली ती शेवटची ६ वाजेची बस तोपर्यँत काय करायचे तेवढ्यात त्याला समोरच पेपरच दूकान दिसल तिथून एक पेपर घेऊन तो कोडी सोडवत बसला बघता बघता कसा वेळ गेला दिनूला कळलेच नाही.

तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 21/09/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं.

विलास मोरे दोषी आहे

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/09/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
अर्जंट काम निघाले असून अॉफिसला चाललोय अशी बायकोला थाप मारली. सगळ कसं गुपचुप व्हायला हवं. कार न्यायच्या ऐवजी बाईक काढली. डोक्यावर हेल्मेट घातले. तिनं दोन वाजता बोलावलं होतं मी अकरालाच निघालो. रस्त्यातच दोन थंडगार बियर घेतल्या. एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी. बियर घेतल्यावर ती कशी सर्वांगात फुलते. आज तिच्या यौवनाचा पुरेपुर आनंद लुटायचाय. मेनरोडपासून थोडासा दूर असलेला तिचा प्रशस्त फ्लँट नजरेत आला. बाईकचा वेग जरासा कमी केला. तेवढ्यात गेटच्या बाहेर येणारा एक सुटाबुटातला माणुस दिसला. हे काय?