Skip to main content

लेख

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

ताम्हणकर

लेखक हकु यांनी बुधवार, 23/03/2016 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक वर्षं झाली मी आमच्या आळीतल्या गणेशोत्सवात उत्साहाने कार्यरत आहे. जसं वर्षं नवीन तशी सजावट नवीन, मूर्ती नवीन आणि संकल्पना सुद्धा नवीन. पण तसं बघायला गेलो तर दर वर्षीच्या या गणेशोत्सवाची कथा, पटकथा, पात्रे आणि अगदी संवाद सुद्धा जसेच्या तसे असतात. जरी वर्ष नवीन असलं तरी जणू काही आपण मागेच पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचे 'रिपीट टेलिकास्ट' पाहतोय असा भास व्हावा. नाही म्हणायला दर वर्षी 'बावा', 'शिरी', 'वाचव' अश्या निरर्थक शब्दांची भर पडत असते इतकेच. मात्र या चित्रपटाची नेहमीची सर्व पात्रं उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण.

दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 22/03/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.

दहशत - एका नव्या रूपात!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/03/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

पाणी बचत काळाची गरज

लेखक वैभव दर्शनराव देसाई यांनी सोमवार, 21/03/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय. त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत .

कमा आणि कमळू

लेखक हकु यांनी सोमवार, 21/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांपासून बाळगून ठेवलेली उत्सुकता दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ ला रात्री शिगेला पोहोचली होती. सर्वांनीच उराशी जपून ठेवलेलं एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आम्ही साक्षात अलंग-मदन-कुलंग ट्रेक करायला जात होतो. अंगात उत्साह सळसळत होताच. अनेक दिवस (?) पूर्वीपासून एकमेकांना प्रोत्साहन देत शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न झाला होता आणि त्या तंदुरुस्तीच्या, उत्साहाच्या आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या आणि तितक्याच श्रद्धेच्या जोरावर आपण सर्व जण आपलं 'लक्ष्य' गाठणार हा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. हा विश्वास नि:संशय रास्त होताच.

मोसाद - भाग ९

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 18/03/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ८ मोसाद - भाग ९ २७ फेब्रुवारी १९६५. पश्चिम जर्मनीमधल्या der Spiegel या नामवंत नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने दिलेली बातमी विचित्र होती – एका नाझी युद्धगुन्हेगाराचा ‘ जे कधीही विसरणार नाहीत ’ अशा लोकांनी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे देशाची राजधानी माँटेव्हिडिओ येथे काटा काढला होता.

पाक-साहित्य संपदा

लेखक उल्का यांनी गुरुवार, 17/03/2016 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला. पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे.

एक कविता : भाषेची

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/03/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे डॉ. गणेश देवी स्थापित ‘भाषा संशोधन केंद्रा’शी त्याच्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणी ‘ढोल’च्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्‍तच्या बाकी भाषा म्हणजे मला ‘काळे अक्षर म्हैस बराबर’ अशा अगम्य. ‘ढोल’च्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना, कॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो.