Skip to main content

लेख

माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 20/09/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी जिम मध्ये एक जबरदस्त गाणे ऐकले ... अर्थात जिम मध्ये कुठली गाणी व का लावतात हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे ... बहुदा सकाळी लवकर अर्धवट झोपेत व्यायामासाठी येणाऱ्यांना जागे ठेवणे या एकाच शुद्ध हेतूने हा गाण्यांचा उपक्रम चालत असावा ... तर आज कुल डाऊन करत असताना ते मंजुळ सूर कानावर पडले (आदळले??? )... काय अर्थपूर्ण शब्द होते .. He is most wanted मुंडा ... आधी तर मला मुंडा च्या ऐवजी गुंडा असेच ऐकू आले ... अर्थात त्याने फारसा फरक पडला नसता .. तर हे असे अर्थपूर्ण शब्द त्यालाच साजेशी चाल .. आणि मागे वाजणारा (गडगडणारा?) वाद्यवृंद ... इतका चपखल कि शब्द पण नीट ऐकू येऊ नयेत ... (तसही मुंडा ..

कंपास पेटी

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 20/09/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

निमशहरी भारताचा बंडखोर नायक : अजय देवगण

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 20/09/2017 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
अजय देवगणबद्दल वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळी मतं आहेत. काही लोक (विशेषतः स्त्रिया) त्याच्या इंटेन्स डोळ्यांच्या प्रेमात आहेत. काही लोकांना तो 'अल्टिमेट अंडरडॉग' वाटतो. काही लोकांना खान त्रयीला आव्हान देणारा 'आपला' माणूस वाटतो. काही लोकांना तो 'अॅव्हरेज' अभिनेता वाटतो. पण माझ्या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या मित्राने अजय देवगणला परफेक्ट डिकोड केले आहे.

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 18/09/2017 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात! गेल्या वर्षभरातल्या अनेक आठवणी आहेत! अजूनही तू आरशासारखी नितळ आहेस. अजूनही तू आमचे तसेच लाड करतेस! समोर येणा-या सर्व गोष्टी तू आनंदाने स्वीकारतेस.

माझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख

लेखक उदय आगाशे यांनी रविवार, 17/09/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल. २०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो. सकाळी लवकर उठून लोकल ने नेरळ गाठल आणि जवळच न्याहारी करून तुफान पावसातच माथेरान येथे पोहोचलो.

आठवणीतला घरचा मेवा -१

लेखक जेडी यांनी शनिवार, 16/09/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकाने ऑफीसमध्ये फुटाणे घेऊन आला होता, चार वाजता खायला. ते विकत आणलेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते . कोठून भाजून आणले रे ? मी विचारले. सासुरवाडीकडून आलेत , तो म्हणाला . अर्थातच मला पूर्वी कधीतरी आईने केलेल्या अगदी तशाच फुटण्याची आठवण आली . हरभरे, हळद , मीठ घालून रात्री आई हरभरे भिजवायची . सकाळी त्यातले पाणी काढून दुरडीत नितळत ठेवायची . मग थोडे सुकवून चार वाजता पिशवीत बांधून ते भट्टीत भाजायला द्यायची , कोणीच भट्टीत घेऊन जायला मिळाले नाही तर सरळ तव्यावर भाजून घ्यायची . डबाभर फुटाणे तयार , फुटण्याच्या बरोबरीने शेंगदाणे पण खारवले जायचे . आठवडी बाजारातून चिरमुरे आणलेले असायचे .

संघर्ष : भाग ०३

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 15/09/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०२ पासून पुढे. अनिकेतने सागर आणि प्रितीला घरी सोडून गाडी राधाच्या घराकडे वळवली अनिकेत काहीच बोलत नव्हता तशी राधाही मौन होती. गाडी घराबाहेर पार्क करून अनिकेत राधाला आत घेऊन गेला राधा खूप दमली होती त्याने तिला सोफ्यावर बसवून कॉफी प्यायला दिली. दिवस मावळत आला होता राधाला असं एकटं सोडून जाणं अनिकेतला योग्य वाटत नव्हतं त्याने परत प्रितीला फोन लावून स्थितीचा अंदाज देत राधाच्या घरी येण्यास सांगितलं. प्रितीने होकार दिला अर्ध्या तासात प्रिती तेथे पोहोचली.

बाबा-बुवांचे सामाजिक काम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/09/2017 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारतात बाबा-बुवांचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. अलिकडे खाजगीत एक चावळ सुरू झालीय की म्हणे हिंदु धर्माच्या बुवांनाच टारगेट केलं जातं. म्हणून इथं एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल की हे बुवा सगळ्याच धर्मात आहेत आणि आपली स्वार्थिक बजबजपुरी त्यांनी आपापल्या धर्मात प्रचारून आपली दुकाने यथास्थित सुरू ठेवलीत.

फासले ऐसे भी होंगे...

लेखक Naval यांनी गुरुवार, 14/09/2017 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ...