Skip to main content

!अनंत मी !

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती! त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्‍या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची. म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते ! आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो! शुभम भवतु !

!माझी छबी!

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात. माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ? जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात !

Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 22/10/2017 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!! माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!' गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

मला भेटलेले रूग्ण - ११

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 19/10/2017 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मोरोपंतांची १०८ रामायणे

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 16/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
(माझा हा पुढील लेख ’ऐसीअक्षरे’मध्ये पूर्वी प्रकाशित झाला आहे.) पंडितकवि मोरोपंत हे व्यवसायाने पुराणिक. बारामतीतील प्रसिद्ध सावकार आणि पेशव्यांचे संबंधी बाबूजी नाईक ह्यांच्या आश्रयाने ते बारामतीला आले आणि तेथेच प्रवचने-कीर्तने करून त्यांची उपजीविका झाली. रामभक्त असलेल्या मोरोपंतांचे शब्दसंपदेवर कमालीचे प्रभुत्व होते. हत्तीने शुंडादंडावर पुष्पमाला खेळवावी तितक्या सहजतेने मोरोपंत भाषेशी खेळतात असे त्यांच्या बाबतीत म्हणले गेले आहे. त्याचप्रमाणे कविता रचण्याचेहि मोठे कसब त्यांच्यामध्ये होते.

समजूत

लेखक दिपक लोखंडे यांनी सोमवार, 16/10/2017 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस.. अनु.." "अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.." "काय सांगताय?.." "हो.. जे बघितलं तेच सांगतेय.." "बरं.. मी बघतो.." "अनु.." "हो, आले आजोबा.." "बेटा कुठं होतीस? असं संध्याकाळी बाहेर फिरणे ठीक नाही.." "का?.. काय होतं संध्याकाळी बाहेर फिरल्याने?.." "अगं.. ते पिंपळाचं झाड आहे ना, त्याच्यावर रात्री एक म्हातारा येऊन बसतो.." "तुमच्यासारखा?.." "छे.. नाही तो खूप वाईट असतो, तुझ्यासारख्या लहान मुलींना आपल्या जाळ्यात फासून त्याचं रक्त पितो.." "अय्या खरचं?.. तुम्ही कधी बघितलं त्याला?" "मी.. मी नाही गेलो कधी तिकडे.. " "मग तुम्हाला कसं माहीत?.." "मला..

बुरख्याआडून...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 15/10/2017 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
धुल-नुन-अय्युब हे इराकचे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. (१९०८) इस्लामच्या परंपरा आणि आधुनिक जगाच्या रितिभाती यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा विषय. इस्लाम धर्मातील स्त्रियांची इज्जत आणि सन्मान राखण्यासाठी स्त्रियांनी उघड्या जगात बुरखा घालण्याची पद्धत सुरु झाली. स्त्रियांना पुरुषांचे दर्शन व्हायचे ते म्हणजे त्यांच्या वडिलांचे, भावंडांचे आणि नंतर नवर्‍याचे. १९२० साली ही परंपरा हळूहळू मोडीत निघू लागली होती पण आता ती परत मूळ धरू लागली आहे. या बुरख्याकडे पाश्चिमात्य जग स्त्रियांवरील अन्याय, दमन म्हणून पाहतात. पण बर्‍याच वेळा इस्लामी स्त्रिया बुरख्याआड वेगळ्या नजरेने पाहतात.

मला भेटलेले रुग्ण - १०

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 15/10/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

एका रात्रीचा थरार

लेखक लाल गेंडा यांनी बुधवार, 11/10/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिनेशने वडापावचा मोठ्ठा घास घेतला आणि समोर बसलेल्या दीनुकाकांकडे पाहिलं. साठीत पण म्हातारा चुणचुणीत होता. डोळ्यातलं तेज जरासं उतरल्यासारखं वाटत होतं पण खरं किती होत तेच जाणे. दिनेशला इथे येऊन दहाच दिवस झाले होते. या दहा दिवसांत दिनूकाकांनी त्याला नोकरीच्या सगळ्या खाचाखोचा समजवून दिल्या होत्या. त्यांचं अख्ख आयुष्य चौकीदारीत गेलं होतं. कोकण सुरू होतो घाटांनंतर तिथलं पहिलं गाव हे. एका बाजूला घनदाट जंगल, डोंगर, त्याच्या दर्या-खोऱ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यातून वाहणारी ती छानशी सुबक पण छोटीशी नदी. दिनेशला पहिल्या फटक्यातच सगळं आवडलं होत.