संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !
सध्याचा काळ गुलाबी थंडीचा..या काळात सर्वत्र आल्हादायक आणि शांत वातवरण असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीची पेरणी झाल्याने शेतकरी ही या काळात काहीसा 'थंड' असतो. नाही म्हणायला खरिपाचा शेतीमाल विक्री आणि कापसासारखं नगदी पीक घरात येण्याचा काळ असल्याने त्याच्याही हातात दोन पैसे खेळू लागलेले असतात. अर्थात, हे चित्र आता इतिहासजमा झाल्यासारखे असल्याने शेतकऱयांची झोप उडालेली आहे. डोक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि कवडीमोल भावात विकला जाणारा शेतीमाल पाहून गुलाबी थंडीतही शेतकऱयांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )
" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . "
" म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? "
" अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . "
" कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली .
" काय ते ? मी ऐकलं नाही . "
" तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . "
" अगं असं का सांग ना काय ते ? "
" ते राहू दे, ते मी असाच बोलत होते .
माणूस आणि एकलेपण
- डॉ. सुधीर रा. देवरे
माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात.
माणूस या जगात एकटा असू शकेल का?
हे टाळता आले असते? -३ एरोपेरू: फ्लाईट- ६०३
हे टाळता आले असते? -१ वारिग फ्लाईट २५४
हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३
१ ऑक्टोबर, १९९६ रात्री मियामीहुन, सॅन्टियागो, चिली येथे जाणारे बोईंग - ७५७ लिमा, पेरू आंतराष्ट्रीय विमानतळावर नियमित थांबा घेण्यासाठी उतरले तेव्हा त्यात १८० प्रवासी होते.
शेजाऱ्याचा डामाडुमा - भारत आणि सख्खा शेजारी मालदीव - भाग १
प्रस्तावना:
माझ्या 'शेजाऱ्याचा डामाडुमा' (http://www.misalpav.com/node/38362) ह्या मालिकेतील नेपाळबद्दलची लेखमाला मिपावर बऱ्याच लोकांनी वाचली. काहींनी इथेच लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन तर काहींनी व्यक्तिगत संदेश पाठवून लेखन आवडल्याचे सांगितले. इथे वाचून काहींनीं अन्य माध्यमांमध्ये लिहाल का अशी विचारणा केली. बरे वाटले, आनंद झाला.
यथावकाश पुढचा देश कोणता, पुढे कधी लिहिणार अशी प्रेमळ दटावणीही झाली. आज -उद्या करता करता बरेच दिवस झाले, लेखन काही पुढे सरकत नव्हते.
कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !
गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अॅटॅक ” हा होय.
सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या कथेतील एक अंश.
"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो."
आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं.
सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री. सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी. तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय?
जादूगाराने सदाला पुरुषभर उंचीच्या बंदिस्त अशा एका लाकडी खोक्याजवळ नेलं.
चला हवा येऊद्या.
सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात.
हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३
वारिग फ्लाईट २५४ चा लेख आपण मिपाच्या दिवाळी अंकात वाचला असेलच. मुळात या विषयावर एक मालिका करण्याचा विचार होता मात्र तसा उल्लेख करणे राहून गेले होते. त्यानुसार या मालिकेतील दुसरा लेख प्रकाशित करीत आहे...
दिनांक २३ जुलै, १९८३ एयर कॅनडा ची फ्लाईट १४३ विमान वाहतूक क्षेत्रातील एका असामान्य घटनेची साक्षीदार आहे.
वैमानिक पियर्सन आणि सहवैमानिक क्विंटल त्या दिवशी सकाळी मॉंट्रेयलहुन एडमॉन्टन ला नियमित जाणारे विमान उड्डाणासाठी तयारी करीत होते.
वैमानिक पियर्सन आणि सहवैमानिक क्विंटल त्या दिवशी सकाळी मॉंट्रेयलहुन एडमॉन्टन ला नियमित जाणारे विमान उड्डाणासाठी तयारी करीत होते.
मिसळपाव