Skip to main content

लेख

काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 19/03/2018 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.

भानुमामी

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 18/03/2018 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
"बेबी डॉल मैं सोने दी"..... मोबाईलचा गजर वाजू लागतो आणि भानुमामीला जाग येते. गाणं पूर्ण होईपर्यंत ती तशीच पडून राहते. गेल्या महिन्यात तिच्या नातीने, रमेने मोबाईलमध्ये हे गाणं टाकलेलं असतं. भानुमामीला तो प्रसंग आठवतो आणि खुद्कन हसू येतं. "भानुमामी, कुठली गाणी टाकू तुझ्या फोनमध्ये?" रमा तिला नवा फोन वापरायला शिकवत असते. भानुमामीला तिचं आजी न म्हणता भानुमामी म्हणणं काही आवडत नसतं. रमेला ती तसं अनेकदा सुचवून बघते. मग एकदा रमा तिला म्हणते "आई रागवेल मला. तिनं सांगितलय आज्जी नाय म्हणायचं.

ग्रामीण निवासस्थाने- घरे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/03/2018 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बागलाण हा एकेकाळी चार जिल्हे आपल्या पोटात घेणारा प्रंचड प्रांत होता. नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदुरबार, आजच्या गुजराथच्या ताब्यात असलेला डांगचा काही भाग अशा या मोठ्या प्रांताला बागलाण म्हटलं जायचं. बागूल राजाची राजवट असलेला तो बागलाण प्रांत. आता हा प्रांत एका तालुक्यापुरता मर्यादित झाला. आजच्या बागलाण तालुक्याचे क्षेत्रफळ केवळ 1616.2 चौ. किमी. असून आताच्या बागलाण तालुक्यात एकूण फक्‍त एकशे सहासष्ट गावे आहेत.

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 11/03/2018 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ …. प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात. न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है ! कै. अविनाश चव्हाण, मंदार काळे, अशोक पाटील यांच्यासारख्या काही स्नेह्यांच्या संगतीमुळे मलाही हिंदी सिनेसृष्टीत दुर्लक्षीत राहिलेले चित्रपट शोधायची सवय लागलेली आहे.

हा क्षण भाग ४

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा भाग तिसरा "Set wide the window. Let me drink the day." - Edith Wharton ------------------------- काळे सर आणि त्यांची क्लासरूम. .. मला पडलेल्या अनेक कोडयांपैकी हा व्यक्ती एक कोडंच. .. साधारणतः तिशीतला, नेहमी चेहऱ्यावर हास्य असणारा, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक क्षणातही आनंद शोधणारा हा व्यक्ती. ..

हा क्षण भाग ३

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
रूम मधून ओमिका आणि तिच्या मैत्रिणींचा हसण्याचा आवाज येत होता. .. तन्मयीने दार ठोठावलं. .. आदित्यची अस्वस्थता आता वाढत होती. .. तन्मयीची ही तीच गत. .. कुणीतरी दार उघडलं. .. इतक्या लग्नाच्या गोंधळात ही त्यांना आतून कड़ी काढल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. .. तन्मयीने आत पाऊल टाकलं. .. तिच्या पाठोपाठ आदित्य ने ही रुममध्ये प्रवेश केला. .. समोर ओमिका. .. तिच्या मैत्रिणी तिच्या हातांवर मेहंदी रंगवत होत्या. .. आदित्य आणि तन्मयी ला समोर बघुन ओमिकाने मैत्रिणींना थांबायला सांगितलं आणि स्वतः त्यांची विचारपुस करायला सुरुवात केली. .. ओमिका च्या मैत्रिणी आधीपासूनच तन्मयी आणि आदित्याला ओळखत असाव्यात. ..

हा क्षण भाग २

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे हाईवे. .. कार ची स्पीड, ताशी ८० किमी. .. आदित्यच्या हातात स्टेरिंग. .. डाव्या बाजूला तन्मयी. .. हातात पार्सल. .. अचानक आदित्य ने ब्रेक मारला. .. समोरून येणारी एक दूसरी फोर व्हीलर अगदी जवळून निघुन गेली. .. आदित्य ने ब्रेक मारण्यास अगदी एका क्षणाचा ही विलंब केला असता तर मोठा अपघात झाला असता. .. दूसरी फोर व्हीलर तशीच समोर निघुन गेली. .. आदित्य आणि तन्मयीने एक वेळ त्या फोर व्हीलर कडे बघितलं. .. ती दूसरी फोर व्हीलर नजरेआड़ झाली आणि आदित्यने स्टेरिंग वर डोकं ठेवलं. .. डोळे घट्ट मिटले. ..

हा क्षण

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ५:०० चा अलार्म आज सुद्धा न चुकता वाजला. .. आदित्य ला उठायचा कंटाळा आला होता, तरी ही तो उठला. .. ऑफिस मध्ये लेट पोहोचणे आदित्य ओफोर्ड करू शकत नव्हता. .. तशी नोकरी त्याला हवी तशीच आणि इन-फैक्ट हव्या त्या कंपनीतच मिळाली होती. .. पण २४ तासांपैकी १२ तास सतत नॉन-स्टॉप काम करणं यामुळे त्याला स्वतःसाठी जगायला पण वेळ मिळत नव्हता. .. तन्मयी सोबत प्रत्यक्ष भेटीला आज जवळजवळ महीना झाला असेल. .. दोन वर्षाआधी आदित्यने "रेफ्लेक्शन्स" सॉफ्टवेयर कंपनी जॉइन केली आणि तेव्हापासून हे असंच चालतंय. .. तसं मगच्याच आठवड्यात आदित्यने तन्मयी ला त्याच्या अपार्टमेंट मध्येच शिफ्ट होण्यासाठी म्हंटलं होतं. ..