काकूंच्या क्लिनरची करामत
काकूंच्या क्लिनरची करामत
---------------------------------------------------------------------------------------
एकेक दिवस काय बोअर असतो ना !....
आज रविवार होता. सुट्टीच्या दिवशी सकाळी काय करावं कळतच नाही. मला पोहे खायचे नव्हते. त्यासाठी आईची बोलणी मात्र खाल्ली होती. मला अभ्यास करायचा नव्हता. कार्टून्स बघायची नव्हती. अंगणात नुसतं उभं तरी किती वेळ राहायचं ?
खरं म्हणजे- मिनी अजून बाहेर आली नव्हती. घरात बसून काय करत असते, कोणास ठाऊक.
मिसळपाव