Skip to main content

लेख

पाणी आंदोलन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/03/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे : सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रतचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं. जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो.

झगमगाटातील अस्वस्थता....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 14/03/2019 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच.

जाब

लेखक मित्रहो यांनी रविवार, 10/03/2019 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाब "ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी आला. तो तिथे ट्रिनिटी चर्चपाशी गेला.

Women 's Day - 2019

लेखक माउ यांनी शनिवार, 09/03/2019 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळीनो ! काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms .. मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे.

मैत्र - ७

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/03/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो. सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला… मी आणि शकील बाहेर आलो. शाम्या इन्नीच्या हातातून दंड सोडवायचा प्रयत्न करत होता. इन्नी घाबरली होती, रडतही होती.

शिवजयंती

लेखक मकरंद घोडके यांनी बुधवार, 06/03/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील?

मैत्र - ६

लेखक शाली यांनी मंगळवार, 05/03/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस धावपळीचा गेला होता तरी सगळे आनंदी होतो. कॉलेजमध्ये वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, उपक्रम या सगळ्या भानगडींपासून दुर रहाणाऱ्या शकीलने आज ‘वक्तृत्व स्पर्धेचा’ करंडक अनपेक्षितपणे खेचून आणला होता. हा करंडक गेला असता तर जोशीसरांचे आठवडाभर शिकवण्यात लक्ष लागले नसते. थकवा जाणवत होता तरी आम्ही नेहमीप्रमाणे शाम्याच्या ओट्यावर जमलो होतो. शाम आणि दत्ता माझी स्कुटर घेऊन सगळ्यांना कप दाखवायला गेले होते. त्यांना बराच वेळ झाला होता जाऊन, एव्हाना यायला पाहिजे होते. मी, ठोब्बा, राम, शकील सगळेच ओट्यावर बसलो होतो. आज कुणीही ओटाकट्याला दांडी मारणार नव्हताच. काकूंनी धोंड्याला मळ्यात पिटाळलं होतं केळी आणायला.

मानवतेचे शत्रू

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/03/2019 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! एखाद्या देशाने समोरून हल्ला केला तर त्याला तशाच कृतीने उत्तर देता येतं. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण दहशतवादाचं स्वरूप वेगळं असतं. दहशतवादी कपटाने हल्ला करत असल्यामुळे संखेने कमी असूनही ते खूप मोठं नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही लक्ष्य केलं जातं. एक दहशतवादी शेकडो बेसावध निशस्त्र लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचं स्वरूप समूळ कळलं नाही, हे अनेक घटनांमधून लक्षात येतं. मानवतेचे शत्रू आपल्या उंबरठ्यावर उभे आहेत.

वैद्यराज

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/02/2019 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
.... एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले. गावातील परंपरागत चालत आलेली वैद्यकी ते समर्थपणे चालवत होते असे त्यांच्या एकंदरीत अवतारावरून वाटत होते खरे..

ट्युमर - शतशब्द कथा

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 25/02/2019 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते . स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते. "हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.