आणि बुद्ध हसला !
१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली.
कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।"
७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं.
मिसळपाव