Skip to main content

लेख

॥ नामा म्हणे प्रदक्षिणा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 21/09/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.

मोनार्क - १

लेखक किलमाऊस्की यांनी मंगळवार, 17/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला.

निर्भया

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 13/09/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
TV वर बातमी पाहिली . निर्भया ला न्याय मिळाला PIFF मध्ये पाहिलेला 38 WITNESSESसिनेमाची आठवण झाली एका CRIME चा उपयोग करून घेऊन , एका महान सत्याची प्रचीती शेवटच्या एका दृश्याने घडवणे,एका थ्रिलर सिनेमाचे रुपांतर एका वैचारिक सिनेमात करणे स्तिमित करून जाते . 38 WITNESSES ची गोष्ट [मला जशी समजली तशी ] पुढील प्रमाणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर रात्री एका तरुणीचा खून होतो . त्या तरुणीचे ओरडणे हिरो ऐकतो . हिरोची बायको बाहेर गावी गेलेली असते ती येते तेंव्हा तिला खुनाबद्दल कळते . नवरा तिला सांगतो कि तो खून झाला त्या वेळेस घरी नव्हता . कामावर गेलेला होता . पोलिसांना तो हेच सांगतो .

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा द

पुस्तकवेडा (लघुकथा)

लेखक मराठे यांनी मंगळवार, 10/09/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या ह्या मुलाचा वाचन व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडतफारच, मग कुठलाही विषय असो. घराजवळच्या पुस्तकाच्या दुकानातून शेकड्यानं पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं). एकदा त्या दुकानात पुस्तकं चाळताना त्याला जाणवलं की त्या दुकानातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं त्यानं वाचून संपवली होती. अचानकच त्याला फार रिकामं वाटू लागलं. ते एवढं मोठ्ठं दुकानही त्याला खूप लहान वाटू लागलं.

गुडबाय मि. चिप्स

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/09/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल. छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

गृहिणी

लेखक kalpana joshi यांनी शनिवार, 07/09/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
गृहिणी गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्याबाळालातीट लावू दे. गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्या बाळ झोपवू दे. चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल! कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते. घरातल्या लोकांच्या काळजीपोटी ही बिचारी झोपते न झोपते, तिचा डोळा लागतो ना लागतो, तोच फटफटीत सकाळ उजाडते.