Skip to main content

बातमी

चीनच्या प्रमूखांना वजन कमी करण्याचा सल्ला !

लेखक माहितगार यांनी रविवार, 21/12/2014 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्‍या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता.

देवास

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 20/12/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या तथाकथित पुढार्‍यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा. नुसतेच राजकारण करुन सरकारच्या नावाने गळा काढून पॅकेज मागणे सोडून असे काहीतरी करावे म्हणजे शेतीमुळे आत्महत्येची वेळ येणार नाही. यावर कोणी म्हणेल की येथेही शेततळी आहेत पण प्रमाण बघा व ती चळवळ बघा. पण आपल्या पुढार्‍यांना (जे शेतकरीच आहेत) त्यांना हे नको आहे कारण मग यांच्या पदरात काय पडणार ? उरला प्रष्न अतीवृष्टीचा. जर या व्हिडिओत दाखवलेली शेती असेल तर मला नाही वाटत शेतकरी एकदुसर्‍या संकटाने डगमगून जाईल. नुसतीच आंदोलने करणार्‍या संघटनांपासून शेतकर्‍यांना वाचव ही प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित.

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/11/2014 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीयांनी धार्मीक संस्कृतीच जतन करावं मात्र इतर क्षेत्रांएवढच शिक्षण क्षेत्र स्त्रीयांपासून कसे दूर ठेवले जाईल याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड करत असतात किंवा केलेला असतो. सध्या बातम्यात येत आहे ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे वाचनालय ज्या मुख्य वाचनालयात सर्वाधिक पुस्तकांची उपलब्धता आहे त्या मौलाना आझाद वाचनालयात मस्जिदी प्रमाणेच प्रवेश बंद आहे. हा प्रवेश बंद असणे हि गोष्ट नवीन नाही.

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

गुड बाय ऑर्कुट

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 30/09/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस! माझे आणि बर्‍याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला .

#मोदीइनअमेरीका

लेखक विकास यांनी मंगळवार, 30/09/2014 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
Modi in America सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....