Skip to main content

बातमी

सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 10/03/2015 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे.

पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्‍या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 10/02/2015 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

लेखक पाहावे मनाचे यांनी शुक्रवार, 16/01/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे. याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील.

श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सव, सनीवेल, कॅलिफोर्नीया अमेरिका

लेखक स्वाजो यांनी शुक्रवार, 16/01/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
॥ गण गण गणात बोते ॥ श्री गजानन महाराज अमेरिका परिवारातर्फे श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव सनीवेल, कॅलिफोर्नीया येथे १४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ साजरा केला जाईल. श्री गजानन महाराज परिवारातर्फे ह्या सोहळ्याचे आपणा सर्वांना मनापासून निमंत्रण आहे. ह्या उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्री महाराज पालखी सोहोळा, 'पादुका-दर्शन' (श्री पुंडलीक भोकरे ह्यांना दिलेल्या पादुकांची प्रतिकृती) आणी 'नामस्मरण सत्र'. उत्सवाची सांगता भंडार्‍याने होईल. बे एरीयातील भक्तगणांकडून जमवलेल्या 'शिध्यातून' महाप्रसाद रांधला जाणार आहे.

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा

लेखक बीएमएम२०१५ यांनी बुधवार, 14/01/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे. या अधिवेशनात भारतातील व उत्तर अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम एका ठिकाणी पहायची संधी मिळणार आहे.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/01/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते .

सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 06/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय.

उजवे - डावे प्रतिसाद ..??..

लेखक माहितगार यांनी सोमवार, 22/12/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच. एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले.