Skip to main content

आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

लेखक भाते यांनी बुधवार, 02/04/2014 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स, कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे. काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे! बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे… तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 23/03/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

काय म्हणाव आता...........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 18/03/2014 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो...... माझे म्हणणे आहे की त्यात लपविण्यासारखे काय आहे ? A classified Indian army report that analyses the causes of India's military defeat in the 1962 border war with China was blocked hours after it was posted on the internet. A large section of the Henderson Brooks-Bhagat report was recently posted by Australian journalist and author Neville Maxwell on his website http://www.nevillemaxwell.com/TopSecretdocuments.pdf . Read more at:

मुक्तविहारींची भाषणभरारी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 04/03/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 03/03/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 03/03/2014 18:14 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी : 

 

"वल्लीं" बरोबर....घारापुरी कट्टा....दि. १ मार्च किंवा ८ मार्च..२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 09/02/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला. वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४....

काळा घोडा फेस्टिवल कट्टा .... ८/२/२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/02/2014 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? रविवारचे जेवण कसे झाले? वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच. कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली. तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे. वार : शनिवार दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४ वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल. भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस पहायच्या गोष्टी , काळा घोडा फेस्टिवल आणि मग फोर्ट मधल्या सुंदर आणि भव्य इमारती. आणि हे सगळे दाखवाय

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.