शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता. बराक ओबामा एवढे फिट नसले तरी किमान रशीयन अध्यक्ष पुतीन सारखे दिसण्याएवढे तरी वजन कमी करावयास हवे असा व्यक्तीगत सल्ला पत्रातून दिला. त्याच्या पित्याला त्याची गंमत वाटली म्हणून त्याने ते आंतरजालावर टाकले.
चीनची आंतरराष्ट्रीय ताकद आणि प्रतिष्ठा वाढत असताना चीनच्या प्रमुखांना त्यांच्याच देशाचा विद्यार्थी वजन कमी करण्याचा सल्ला देतो म्हणजे काय ? ) सहाजीक चिनी आंतरजालावर त्यावर विनोद होऊ लागले म्हणून चीन सरकारच्या आंतरजाल सेंसॉरने ते पत्र आणि संबंधीत वृत्ते चीनच्या आंतरजालावरून काढून टाकून प्रतिबंधीत केली. आंतरजाल आणि माध्यमे सेंसॉर करता येतात पण लोकांमध्ये एकदा पोहोचलेली गोष्ट लोकांमध्ये चर्चीत झाल्या शिवाय राहील का ?
संदर्भ
चीनचे प्रमूख "षी चिन्पिंग" सौजन्य विकिमीडिया कॉमन्स
वाचने
3221
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे म्हणजे 'तेच' ना?
होय !
In reply to हे म्हणजे 'तेच' ना? by तुषार काळभोर
* Just How Successful Is Xi
असाच सल्ला महाराष्ट्रातील आणि
श्रीगुरुजी(डुप्लीकेट) मस्त
In reply to असाच सल्ला महाराष्ट्रातील आणि by श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी(डुप्लीकेट)
मझेअमम
महाराष्ट्राच्या
In reply to मझेअमम by यमगर्निकर
चीनी कम