आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात.
2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे. बुकस्ट्रक तर्फे त्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट फँटसी कादंबरी चा पुरस्कार मिळाला होता.
आज एका वर्तमानपत्रात एक बातमी दिसली आणि मग मी इन्टरनेट वर शोध घेतला. त्यानुसार 22 ऑक्टोबर 2016 च्या एका बातमीनुसार बर्मुडा ट्रँगल मध्ये जहाज आणि विमानं गायब होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग कारणीभूत आहेत जे गरम असून एखाद्या बॉम्ब सारखे स्फोटक असतात असे सांगितले आहे.
माझ्या "जलजीवा" कादंबरीत सुद्धा "बर्मुडा ट्रँगल" वरून प्रेरित होऊन मी "डेव्हिल्स स्क्वेअर" नावाचा एक समुद्रातील चौकोनी भाग दाखवला आहे ज्यात असेच विमानं आणि जहाज गायब होतात आणि त्याचे कारण ढग (जलजीवा रूपातील) आहेत असे मी लिहिले होते.
काय योगायोग आहे बघा, एखादी कल्पना नंतर सत्यात उतरू शकते किंवा एखादे रहस्य ते उलगडण्यापूर्वीच एखाद्याच्या कल्पनेत उलगडू शकते! अर्थात कादंबरीत थोडा ज्यादा फँटसी इलेमेंट आहे. पण मी असं नक्की म्हणू शकतो की माझी कादंबरी सत्याच्या 50 टक्के जवळ जाणारी सिद्ध झाली आणि अर्थातच हे सांगायला मला आनंद वाटतो. नाहीतरी कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती मनात (कल्पनेत) तयार व्हावी लागते. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती आधी त्याच्या मनात तयार होत असते. नाही का?
बातमी - https://bigthink.com/paul-ratner/the-mystery-of-the-bermuda-triangle-ma…
गुगल प्लेस्टोर वरील लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=bookstore.marathi.jaljiva
मायबोली वरील लिंक - https://www.maayboli.com/node/23754 (येथे तुम्हाला वाचकांच्या प्रतिक्रिया वाचता येतील, तसेच ती कादंबरी क्रमशः प्रसिद्ध केलेल्या भागांच्या लिन्क्स आणि त्यावरच्या वाचकांच्या प्रतिक्रियाही वाचायला मिळतील)
तसेच "मिसळपाव" वरच्या "जलजीवा" या कादंबरीच्या आतापर्यंतच्या सगळ्या भागांच्या लिंक्स :
https://www.misalpav.com/node/16118 part 1
https://www.misalpav.com/node/16147 part 2
https://www.misalpav.com/node/16163 part 3
https://www.misalpav.com/node/16189 part 4
https://www.misalpav.com/node/16200 part 5
https://www.misalpav.com/node/16228 part 6
https://www.misalpav.com/node/16265 part 7
https://www.misalpav.com/node/16313 part 8
https://www.misalpav.com/node/16420 part 9, 10, 11
https://www.misalpav.com/node/16566 part 12
https://www.misalpav.com/node/16667 part 13
https://www.misalpav.com/node/16747 part 14
https://www.misalpav.com/node/16751 part 15
https://www.misalpav.com/node/16862 part 16 final
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन !!
अभिनंदन !!
पण मी असं नक्की म्हणू शकतो की
सोनारसाहेब तुम्ही जिनिअस आहात हे माहीत होतेच मिपाकरांना. आता तर शिक्कामोर्तब झाले. आनंद वाटला.
सहमत आहे..
In reply to पण मी असं नक्की म्हणू शकतो की by अभ्या..
अगदी अगदी. सोनार साहेबांच्या प्रतिभेला सलाम.
फ्लशस वन!
In reply to सहमत आहे.. by सतिश गावडे
फ्ल
शस वन!अजून एक ह्रायलं-
In reply to फ्लशस वन! by अत्रुप्त आत्मा
अजून एक ह्रायलं-
असा झाला तर तो सगळा प्रकार एकंदरीत! ;)
हार्दीक अभिनंदन !
हार्दीक अभिनंदन !
असंच लिहीत रहा.
हार्दिक अभिनंदन!
पुस्तक प्रसिद्धीसाठी हार्दिक अभिनंदन!
हार्दीक अभिनंदन !
हार्दीक अभिनंदन !
अभिनंदन नि.सो. लिहित रहा.
अभिनंदन नि.सो. लिहित रहा. अजुन चांगलं जमेल.
अभिनंदन.
अभिनंदन.
प्ले स्टोर वर कादंबरी टाकण्याची आयडिया कोणाची होती आणि ऍप कोणी बनवले? आजपर्यंत कधी एकाच पुस्तकासाठी असलेले ऍप नाही पाहिले - म्हणून जाणून घेण्यास उत्सुक.