मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

मूकवाचक ·
या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण

मूकवाचक ·
या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

मूकवाचक ·
या प्रकरणात ध्यान आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक असणारी एकाग्रता या दोन गोष्टींविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: रमण महर्षींचे असे मत होते, की जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य

मूकवाचक ·
या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती.

केशरी लाट

आपला अभिजित ·
एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात. सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही. `तो` आग ओकायला लागलेला असतो. अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो. असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते.

तुकोबांचे निवडक अभंग

प्रसाद गोडबोले ·
|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता !

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व

मूकवाचक ·
या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः).

अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...

सूक्ष्मजीव ·
हरिहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण

मूकवाचक ·
भक्ती आणि समर्पणभावविषयक भगवान श्री रमण महर्षींचा उपदेशाचा आपण या प्रकरणात गोषवारा घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांचा प्रस्तावनेतील सारांश असा आहे: जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. परंपरेने समर्पणाच्या मार्गाची सांगड नेहेमी उपास्य आणि उपासक अशा द्वैतभावावर आधारलेल्या भक्तीभाव आणि उपासनापद्धतींशी घातलेली दिसते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)

मूकवाचक ·
या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांशः 'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्वैत वेदांताच्या अनुयायांनी अंगीकारलेल्या भूमिकेशी कमालीचे साधर्म्य असल्याचे दिसते.