Skip to main content

हम है मताअ-ए-कुचा

प्रकाशित मुखपृष्ठ
हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१ इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२ वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३ सीधी है राहे-शौक, पे यूं ही कहीं कहीं खम हो गयी है गेसू-ए-दिलदार की तरह ...४ अब जा के कुछ खुला ., हुनरे-नाखुने-जुनूं जख्मे-जिगर हुए लबो-रुख्सार की तरह ...५ "मजरूह", लिख रहे है वो, अहले-वफा का नाम हम भी खडे हुए है गुनहगार की तरह ...६ महरूह् मताअ ..मालमत्ता, माल, वस्तू. . कूचा--गल्ली. निगाह ... नजर. तश्नगी ... तहान. नादार ... निर्धन, कंगाल, गरीब. शै ... वस्तु, पदार्थ. राह ... मार्ग, प्रतिक्षा, आशा. शौक .. शौक, हौस, लालसा, इच्छा. खम .. वक्र, कुरळे, गेसू-ए-दिलदार ... प्रेयसीचे केस .जुनू ... उन्माद, वेड लब ... ओठ. रुख्सार .. गाल. अहल ... लोक, उचित, पात्र. अहलेवफा ... प्रेमी, प्रामाणिक. आयुष्यात अनेक वेळां आपणास असे वाटावयास लागते कीं आपले जीवन ही एक कवडीमोलाची वस्तु आहे.कोणाला त्याची किंमत नाही. रस्त्यावर-फूटपाथवर विकल्या जाणार्‍या फुटकळ वस्तूप्रमाणे कोणीही यावे, उचलून उलटसुलट करून पहावे, नजरेनेच किंमत विचारावी व परत फेकून देऊन पुढे चालू लागावे ! मानी माणसाला हा अनुभव हृदयात खोल जखम करणारा असतो.या अशा वैराण जीवनांत एखादा आपल्या सारखाच सामान्य माणुस क्वचित केंव्हा जरा सहानभुती दाखवितो व त्यावेळीं त्याची किंमत घशाला कोरड पाडणारी तहान लागली असतांना रस्त्यावरील एखाद्या झोपडीत मिळणार्‍या घोटभर पाण्यासारखी अमोल वाटू लागते. हे झाले बाहेरच्या माणसांचे. ते तर परकेच. पण आपण जिला आपली समजलो होतो ती, ती तर केंव्हाचीच दुरावली आहे ; मीलनाची आशाही उरलेली नाही. पण तिच्या नजरेप्रमाणे एखादी वस्तु आपल्या आसपास सारखी फिरत आहे हा भास मात्र आपणास सारखा होत असतो. आता प्रेमाची साधीसुधी वाट ; तीत अडथळे यावयाचे काही कारणही नाही. पण तीही असे एखादे वळण घेते की आपण गुमराह होतो ( पण अशा घोर प्रसंगातही आठवण होते ती तिच्या कुरळ्या केसांची ). उन्मादात गालावर-ओठावर झालेल्या जखमांतून भळाभळा रक्त वहात आहे, पण ते ठीक आहे ; ते तर ओठातून बहरलेले काव्यच आहे. खैर, ती म्हणे प्रामाणिक प्रेमिकांची यादी लिहावयाला बसली आहे. चला तर, "मजरुह", (आता प्रेम करण्याचा गुन्हा घडलाच आहे तर ) गुन्हेगाराप्रमाणे रांगेत उभे राहिलेच पाहिजे ! मजरूह सुलतानपुरीची ही गझल लताने "दस्तक" सिनेमात गायली आहे. १९७० चा बर का. ९६चा महेश भटचा नव्हे. लताच्या आठवणीत रहाणार्‍या गाण्यांत बहुतेक सगळी करुण रसातीलच आहेत, पण या गझलेतील भावनेला तिने दिलेली दर्दभरी साथ.... क्या कहिये ! मदन मोहनचे संगीत नेहमीच भुरळ पाडंणारे. पण या तबकडीतली त्याने दिलेली सुरावट खोल जखम करणारी आहे. वाईट एकाच गोष्टीचे वाटते सगळी गझल ऐकावयाला मिळत नाही. पण तीन शेर ऐकावयास मिळाले, काय कमी आहे ? गझल ऐका : songid=49369&br=medium&id=30837&page=movies शरद

याद्या 2464
प्रतिक्रिया 9

लेखनप्रकार

लता मंगेशकर यांनी गायलेली अप्रतिम गझल ... त्याचा अर्थ उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद ! .. अगदी, अगदी. सहमत.

वा!! या गझलेतले बरेच शब्द माहित नव्हते........मी जे ऐकतिये ते चुकिचे कि बरोबर तेही समजत नव्हते. बरेच अर्थ सांगितल्याबद्दल आभार!

आणि तितकाच छान अर्थ. रेवतींसारखंच गाणं, शब्द महित होते पण बर्‍याच शब्दांबद्दल ते तसेच आहेत अशी खात्री नव्हती. आतापर्यंत गाणं पाहिलं नव्हतं. का कोण जाणे, आधी ते ऐकताना समोर प्रिया राजवंश यायची तर कधी अदालत मधली नर्गिस. त्यामुळं हकीकत की अदालत हा संभ्रम होता. आताच गाण्याची चित्रफीत पाहिली आणि सगळे संशय फिटले. :-) आणखी अशा रसग्रहणांच्या प्रतिक्षेत

मजरुह जींचे हे गाणे हृदयाला जाऊन भिडते ...अगदी खोलावर जखम करुन जाते.. जेव्हा पण हे गाणे कानावर पडते तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणविते कोणतीही देहविक्री करणारी स्त्री कोठ्यावर बसायला / बाजारात उभे रहायला काय काय दिव्यातून जात असेल... त्यांच्या वेदना / तडफड या गाण्यातून हृदय हेलावून टाकते . कोणात्याही स्त्रीला "मताअ-ए-कुचा-ओ-बाजार" व्हायला कधीच आवडणार नाही.. वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास फ़िरती है कोई शै, निगाहे यार की तरह हे कडवे तर भितीने अंगावर काटे / शहारेच आणून जाते. मग ज्या स्त्रीया या घाणेरड्या "निगाहे यार" च्या रोज शिकार होतात त्यांची काय गत ! काळीजच पिळवटून निघत असेल ...I feel empathy towards them and not the Sympathy.. I can feel the pain what they must be going through ..Being a woman..I can actually feel their pain in my heart . परमेश्वरा ! हे असले आयुष्य का देतोस तू त्यांना ?