प्रतापगड अनुभव
परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले' मालिका बघत होतो. एरवी ही मालिका फक्त मनोरंजन म्हणून पाहणारा मी पण मालिके मध्ये दाखविलेल्या काही प्रसंगांमुळे काही जुन्या आठवणी चाळवल्या.
साल १९९९, स्थळ: प्रतापगड. ओळखीच्या गटा सोबत महाबळेश्वर ते प्रतापगड हा ट्रेक करत होतो. दुपारी जेवण करून महाबळेश्वरच्या बॉबे पॉइंट वरून निघून पारगाव - अफझलखान समाधी असे करत प्रतापगड वर पोचणे हा कार्यक्रम होता. अंतर साधारण १६ किमी ( ४ तास) . प्रतापगडच्या MTDC च्या रेस्टहाऊस मध्ये रात्रीच्या जेवणाची आणि राहण्याची आधीच सोय केलेली होती. ट्रेक मस्त चालू होता. काही नव्या ओळखी झाल्या होत्या. अंतर ही तसे फार दमवणारे नव्हते. साधारण ६ च्या दरम्यान अफझलखान च्या समाधीचं दर्शन घेऊन प्रतापगड कडे निघालो. फारतर अर्धा तास राहिला होता गडावर पोचायला. मी, जळगावचे एक डॉक्टर आणि पुण्याचा एक मुलगा असे तिघे सगळ्यात पुढे होतो. बाकी चमू बराच मागे होता. गडाच्या थोडंसं अलीकडे जंगलात आम्ही तिघे बाकी चमूची वाट बघत थांबलो होतो. पुण्याचा तो मुलगा लघुशंकेसाठी झाडीत गेला. थोड्याच वेळात त्याचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही तो गेला त्या दिशेला धावलो तर तो झाडीतून आमच्या कडेच पळत येत होता. तो आम्ही उभे होतो तिथपर्यंत पोचला आणि 'ते.. ते.. तिथे.. तिथे' एवढंच बोलत होता. डॉक्टर त्याला 'अरे काय जाल? साप बघितला का? काही चावला का? ' असे विचारत होते पण तो काहीच बोलत नव्हता आणि बघता बघता तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आमची बरीच धावा धावा झाली. मी बाकी लोकांना बोलवायला खाली पळालो तो पर्यंत डॉ नि त्याला उचलून रेस्टहाऊस पर्यंत नेलं होतं. आधी सगळ्यांना वाटलं त्याला काही तरी चावलं आहे म्हणून गाडीतळावर एक गाडी त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी तयार ठेवण्यासाठी सांगितली होती. पण त्याच्या शरीरावर तश्या काहीच खुणा नव्हत्या आणि नाडीची जलद गती एवढं सोडलं तर बाकी काहीच लक्षण नव्हती. डॉ च्या मते तो कसल्या तरी शॉक मध्ये होता आणि त्याला थोडीशी विसरती मिळणे आवश्यक होते. डॉ नि सर्वांना धीर दिला.ह्या पूर्णं प्रसंगात नेतृत्वं आपोआपच डॉ कडे गेलं होतं. थोड्या वेळांनी त्याला जाग आली आणि तो हमसून हमसून रडायला लागला. डॉ नि सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि एकटेच त्याच्याशी बोलायला थांबले. आमच्या मध्ये वय वर्षे १५ च्या आत मधली बरीच मंडळी होती (इंक्लुडींग मी) . हा असं प्रसंग कोवळ्या मनाला कितपत झेपेल आणि त्याचा पुढे किती इंपॅक्ट पडेल हा अम्हाला त्या मागचा कळवळा. त्या मुलाने डॉ ला काय झालं ती सर्व हकिकत सांगितली (जी आम्हाला बरीच नंतर कळली).
तर तो लघुशंके साठी गेला असता त्याला तिथे एक विहीर दिसली. तो विहिरी जवळ गेला आणि आतमध्ये वाकून कसले कसले आवाज काढले (बऱ्याचं लोकांना अशी सवय असते). त्या विहिरीत आवाज घुमत होता. आपल्याला नवीन एको पॉइंट मिळाला आहे हे सांगण्यासाठी तो परत अम्ही उभे होतो त्या दिशेने निघाला. त्याला मागे कोणीतरी हसण्याचा आवाज आला (विहिरीतून). त्याने मागे वळून पाहिले तर परत आवाज आला. हे सगळं त्याला सहन नाही झालं आणि आमच्या दिशेने पळत निघाला.
त्याला त्या रात्री भरपूर ताप भरला म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला स्पेशला गाडीनी आधी महाबळेश्वराला, तिथे काही प्राथमिक तपासण्याक
रून पुण्याला नेण्यात आले. ह्या सर्व प्रसंगानंतर अर्थातच आमचा ट्रेक तिथेच संपला (आमचा प्लॅन दुसऱ्या दिवशी घोणसपूर मार्गे मधुमकरंद गडावर जाण्याचा होता). आम्ही सर्व एसटी नि आपापल्या गावी परतलो.
डॉच्या मते हा केवळ भास होता आणि त्या सर्व प्रसंगाला भुताटकी च्या ऍंगल नि पाहू नये असे होते. खूप दमल्या नंतर शरीरात कमी पडलेले पाणी आणि इतर सर्व सॉल्टस मुळे मेंदूला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही आणि असे भास होतात अस त्याचं मत होतं. वाळवंटात आणि हिमालयात होणारे दृष्टिभ्रम हे त्यातलेच प्रकार. असं होण्या मागे शास्त्रिय कारण त्यांनी अम्हाला पटवून सांगण्याचा प्र्यत्न केला. त्यांना स्वथला हिमालयात ट्रेकिंगच्या वेळी प्राण्वायू कमी पडल्यामुळे आलेले अनुभव सांगितले. हा त्यातलाच प्रकार आहे हे ही पटवून दिले. त्यांनी आम्हा सर्व मुलांना बराच धीर दिला आणि घाबरून न जात हा केवळ वेगळा प्रसंग म्हणून त्याच्याकडे पाहावे हा सल्ला दिला. त्याचं तर मत होते की पुढचा कार्यक्रम रद्द न करता तसाच पुढे चालू ठेवावा असे होते. अर्थात त्या मन:स्थितीत कोणिच त्याला दुजोरा दिला नाही. प्रत्येकाला आपापल्या घरी सुरक्षित कोशात जायचे होते.
तिथल्या स्थानिक मंडळीनि नंतर तिथे घडलेल्या अजून काही अद्भुत गोष्टी सांगितल्या पण त्या सर्व अतिश्योक्ती वाटत असल्याने आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्श्य केलं.
मी त्या वेळी १५ वर्षाचा होतो आणि सहाजीकच माझ्या वर ह्या अनुभवाचा बराच प्रभाव पडला. पण ह्या सर्व प्रसंगात माझे हीरो होते डॉ. त्यांनी जे मनोधैर्य दाखवले आणि कठीण काळात पूर्णं टीमच मनोधैर्य खचू न देण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरेच वाखण्या जोगे होते. कधी कधी मी विचार करतो, त्या संध्याकाळी जेव्हा तो मुलगा झाडीतून घाबरून आमच्या दिशेने पळते येत होता, तिथे जर डॉ नसते तर मी काय केले असते? निर्णय घेणं तर सोडाच नक्की काय घडत आहे तेच मेंदू पर्यंत पोचत नव्हतं. सगळं कस स्वप्नवत चालू आहे असे वाटत होते.
त्या नंतर मी असंख्य वेळा महाबळेश्वर ला गेलो असेन. महाबळेश्वर ला गेलो की प्रतापगडला ही जातोच. प्रतापगडाला गेलो की त्या विहिरीजवळ पण जातो. पण खरचं सांगतो अजून पण आत मध्ये वाकून काही ओरडन्याचे धाडस होते नाही.
टीप : हा प्रसंग जसा घडला तसा नमूद केला आहे. कोणत्याही स्थळाची बदनामी करायचा हेतू नाही. महाबळेश्वर, प्रतापगड, मधुमकरंदगड, कमळगड, चंद्रगड, भीमाची काठी आणि परिसर हे माझ्यासारख्या भटक्या साठी काशी समान आहेत.
वर्गीकरण
छान अनुभव कथन ...
In reply to छान अनुभव कथन ... by योगी९००
असेच म्हणते. कशाला एकटं
In reply to छान अनुभव कथन ... by योगी९००
त्यांचे पुण्यस्मरण
परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले
छान अनुभव ..... अजुन लिहित
बापरे!
भयानकच!
अद्भुत! आम्ही लहानपणी
त्याच्या इको-नाट्याने
असो
बापरे
ऐला!! भारीच अनुभव!!
In reply to ऐला!! भारीच अनुभव!! by राजेंद्र मेहेंदळे
भारीच!
In reply to भारीच! by अनंत छंदी
हा चकवा
In reply to भारीच! by अनंत छंदी
पेब ट्रेक
In reply to पेब ट्रेक by राजेंद्र मेहेंदळे
ह्या अनुभवात चकव्यापेक्षा
In reply to ह्या अनुभवात चकव्यापेक्षा by यशोधरा
+1
In reply to +1 by सह्यमित्र
माझा चकव्याचा अनुभव
डॉक्टर
हे अनिस वाले डरपोक असतात. १५
In reply to हे अनिस वाले डरपोक असतात. १५ by अभिजित - १
मस्त.... म्हणजे मोठा गट असला की भूतांची फाटते....
In reply to मस्त.... म्हणजे मोठा गट असला की भूतांची फाटते.... by ज्ञानोबाचे पैजार
भुतांना पण १५/२० चा गट करुन
In reply to भुतांना पण १५/२० चा गट करुन by अभिजित - १
अनिस
भारी अनुभव!
चिपळुण जवळ एकदा भैरवगड ट्रेक
ढाकच्या खालच्या मैदानावर
ह्म्म
जेवढ्या प्रमाणात राजगडावर
रात्रीचा पाहुणा !
मिपावरील तज्ञ , सुज्ञ
In reply to मिपावरील तज्ञ , सुज्ञ by नुस्त्या उचापती
+१
In reply to मिपावरील तज्ञ , सुज्ञ by नुस्त्या उचापती
"मिपावरील तज्ञ , सुज्ञ
मला रात्री अशा जंगलांत,
In reply to मला रात्री अशा जंगलांत, by एस
बाबौ!
In reply to बाबौ! by रेवती
भूतोंके
भुते तुम्हाला घाबरत असावीत:)
भुताचा एक किस्सा... आमचे
In reply to भुताचा एक किस्सा... आमचे by उगा काहितरीच
हसून हसून निर्वाण पावलो आहे.
किरो
डॉक्टरांचे कौतुक वाटले.
दादाजी कोंडदेव, समर्थ रामदास