Skip to main content

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

मिस्ड कनेक्शन्स

लेखक ट्रेड मार्क यांनी शुक्रवार, 28/10/2016 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेंच कनेक्शन तब्बल चार वर्षांनी आमचं भारतात जायचं ठरलं. मुलींच्या शाळा बुडू नयेत म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जूनमध्ये जायचं असा प्लॅन करून फेब्रुवारीमधेच डील्स शोधायला सुरुवात केली. आम्ही चौघे आणि बरोबर एका मित्राची बायको आणि २ मुले असे एकूण ७ जणं जून मध्ये जाणार होतो. सुट्टी फार नसल्याने मी एका महिन्यात परत येणार व बाकी सगळे २ महिने म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहणार होते. माझा मित्र जुलै मध्ये भारतात जाऊन या बाकी सगळ्यांबरोबर ऑगस्टमध्ये परत येणार होता. बऱ्याच संशोधनाअंती Indianeagle.com (IE) नामक वेबसाईट वर एक चांगलं डील दिसलं.

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात?

कैलास लेणी आणि परिसर.........अनुभव-१

लेखक वैभव पवार यांनी बुधवार, 19/10/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सर, त्यांनी विद्यार्थ्यांकडे 'वेरूळ-लेणी' भेट देण्याबाबद कल्पना मांडली. मी स्वतः औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये राहत असून हि एकदाही 'वेरूळ-लेणी' बघण्यास कधी गेलेलो नव्हतो. जवळच घृष्णेश्वर आणि खुलताबाद(रत्नापूर) भद्रा मारोतीला शंभर वेळा जाऊन आलेलो आहे. पण 'कैलास लेणी', अजून नाही! आमच्या हडको ब्रँचचे ५-६ विद्यार्थी तयार झाले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँच मध्ये जास्त उत्साही कार्यकर्ते होते. दिवस ठरला आम्ही ६ जणांनी दुचाकीवर जाण्याचे ठरवले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँचवाले मिनी बस करून येणार होते.

माझी पहिली मैत्रीण रॉक्सी

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी बुधवार, 19/10/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतला “खंड्या” धडा वाचायच्या आधीपासूनच मला कुत्रा प्राणी फार आवडतो. माझं हे प्रेम खेड्यात सुरु झाल्याने ते अस्सल देशीच राहिलं. पुलंनी “रावसाहेब” मध्ये सांगितलेली वेव्हलेन्थ प्राणि मात्रांच्या बाबतीतही लागू पडते असा माझा अनुभव आहे. ज्याच्या डोक्यावरून मी सहज हात फिरवला त्याने माझ्यात काय पहिले कोणास ठाऊक, तो थेट शेतापर्यंत सोबतीस आला. मी त्याला भाकरी दिली नव्हती न बिस्किटाची चटक लावली होती. फक्त प्रेमापोटी साथ देणार हे रस्त्यावरच पिल्लू नंतर माझा जिगरी मित्र झाला. माफ करा मैत्रीण झाली कारण ती एक कुत्री होती.

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/10/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . . ओशो. . . . जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . .

छंदांतून अर्थार्जन अथवा आवडीचे व्यवसायात रूपांतर

लेखक तेजस आठवले यांनी रविवार, 16/10/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे. मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.

पाच रुपयांचा फंडा

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 14/10/2016 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
पिंग पिंनिंग ..पिंग पिनिंग ... मोबाईलात सहाचा गजर झाला. धडपडत उठून ब्रश केलं, तोंड धुतलं आणि फ्रीज उघडल. दुध कालच संपलेलं. पन्नासची नोट आणि कॅरी बॅग घेऊन दुधवाल्याकडे गेले. दुधाचे दुकान कॉलनीच्या त्या टोकाला. लीटरचा पाउच घेतला आणि पन्नासची नोट त्याच्या हातावर टिकवली ‘छे रुपया छुट्टा देव भाबी.’ ‘सुबे सुबे कैसा छुट्टा ? अब्बी तो निकली.’ ‘तो चार रुपयेका क्या दू बोलो.’ ‘कुच्च नको मेरेको..’ ‘तो ठैरो अब्बी दुसरा गिराक आये तब लेना.’ घरात पडलेली सकाळची कामं आठवत तिथेच उभी राहिले. पाच सात मिनिटांनी चार रुपये हातात पडले. पळत सुटले. ‘एक कोल्हापूर.’ मी पन्नासची नोट कंडक्टरच्या हातात ठेवली.

हमारा स्टेशन हमारी शान

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 05/10/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
'बोरीवली स्टेशनचा कायापालट' अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं.