Skip to main content

अनुभव

अनुभव — मिसळपाव सदस्यांचे खरेखुरे जीवनानुभव. प्रवास, नोकरी, घर-संसार आणि आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांच्या मराठी अनुभवकथा येथे वाचा.

मकरंद बोरीकर

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 03/01/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.

आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती.

कर्वेनगरात

लेखक दाह यांनी सोमवार, 02/01/2017 16:02 या दिवशी प्रकाशित केले.

जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.

तुलपा - हादरवून टाकणारा योगिक अनुभव

लेखक साहना यांनी शनिवार, 31/12/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.

मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला.

स्लेन्डरमन मर्डरस :

...लहान दिवा लवकर विझतो!

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 28/12/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.

खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही.

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.

---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.

कासव

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 26/12/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.

"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं"
"तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा"
"बाप नाय डोस्क्याला ताप हाय"

आठवणी दाटतातः माझी मुंबई

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 25/12/2016 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

माझी मुंबई जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं. मुंबई हे माझं जन्मस्थळ,शाळा इथेच,महाविद्यालय इथेच,सासरही इथेच.परळ,दादर,माहीम परिसर पायाखालचा.शिवाजीपार्क म्हजे अंगणच जणू,शाळेचा खेळाचा तास शिवाजीपार्कतच. आता मात्र इथे उद्यान गणेशाचे प्रस्थ खूप वाढले आहे,मीनाताई ठाकरेंचा पुतळा आला आहे,बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे.वसंत देसाई यांचे स्मृतीशिल्प आले आहे…

आठवणी दाटतातः रस्ता तेथे एस टी

लेखक स्वीट टॉकर यांनी शनिवार, 24/12/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.

रस्ता तेथे एस् टी मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. वर्षात दोन सुट्ट्या. त्यामुळे चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. लाल बसनी बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते (महाड मार्गे) पाचगणी सात तासांचा प्रवास. रस्त्यांची अवस्था बिकट. त्या रस्त्यांवर धावून धावून गाड्याही खिळखिळ्या. ड्रायव्हरनी इंजिन सुरू केलं की सतारीच्या तरफेच्या तारांप्रमाणे बसचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे थरथरायचा. सीटवर बसल्यावर आपलं डोकं जिथे टेकतं तिथे हल्ली कुशन असतं. ते लाड तेव्हां नव्हते. एक लोखंडी आडवा बार असायचा. शाळकरी वयात झोप अनावर…