Skip to main content

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 12/12/2016 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 10/12/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;) काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 10/12/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती. मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 09/12/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 09/12/2016 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे.

मुंबई

लेखक अमिता राउत यांनी बुधवार, 07/12/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात मुंबई हि स्वप्नांची नगरी आहे ..... एअरपोर्ट ते CST च अंतर कापत टॅक्सी पहाटेच मुंबई दर्शन घडवत होती . रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंच उंच इमारती काही नवीन तर काही टॅक्सिच्या आवाजांनी पडतील कि काय अश्या अवस्थेत; चिक्कार धुळीने माखलेली, काळवंडलेली दारं खिडक्या आणि त्यात बाहेर वळत टाकलेले कपडे ; ते कपडे धुतलेले होते कि धुवायचे याचाच प्रश्न होता. नेहमी बातम्यांमध्ये, सिनेमानं मध्ये बघ्यायला मिळणारी मुंबई प्रत्येक्षात वेगळीच आहे. पहाटेचे ४ वाजले आहेत पण दिवस उजाडल्या गत गर्दी करत लोक आपापल्या कामाला लागली होती .

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 06/12/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं. मी देवळात जाणारा नव्हे.

महेश्वरची मंतरलेली पहाट!

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 29/11/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते. 'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच! ... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच.

बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/11/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो. स्वानुभव १९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.