Skip to main content

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

विहार... भाग १

लेखक चिनार यांनी मंगळवार, 21/03/2017 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
निळ्याशार समुद्रात रोजच्याप्रमाणेच अहमद होडी घेऊन निघाला. सोबतीला त्याचा वीस-एकवीस वर्षांचा कोवळा मुलगा इरफान होताच.खरं म्हणजे, आज मुलाला सोबत घेण्याची त्याची इच्छा नव्हती. भर समुद्रात मुलाला काही त्रास झाला तर काय हा प्रश्न आज पहिल्यांदा त्याला पडला होता. पण इरफान घरातही स्वस्थ बसला नसताच. इरफान क्रिकेट खेळायचा.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे एकतर वडिलांसोबत समुद्रात जाणे किंवा क्रिकेट खेळणे एवढाच त्याचा उद्योग असायचा.

सुरवंट

लेखक तिमा यांनी मंगळवार, 21/03/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.

एका बोक्याची गोष्ट - भाग ४

लेखक निलम बुचडे यांनी गुरुवार, 16/03/2017 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग ४ हा भाग समजण्यासाठी मी आमच्या मांजरांची वंशावळ देत आहे. ****वंशावळ क्रमांक १ **** १. आमचा बोका - त्याचे नाव "बाबू" पांढरा रंग पण मानेवर पाठीवर केशरी आणि शेपटी केशरी. २.

एका बोक्याची गोष्ट - भाग ३

लेखक निलम बुचडे यांनी बुधवार, 15/03/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग ३ * विशेष सूचना - ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. * वाचकांच्या प्रतिक्रियेतून एक सूचना मिळाली की 'आमच्या बोक्याला काय वाटतं' ते लिहा. या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!! कारण मी हे विसरुनच गेले होते की त्याला काय वाटतं हे देखील आमच्या कुटुंबातील माणसांना समजतं. हिवाळ्यातला एक किस्सा सांगते. थंडीच्या दिवसांत सकाळी आम्ही सगळे कुटुंबिय आणि आमचा बोका आमच्या अंगणात उन्हाला बसलो होतो. थोड्या वेळाने आमचा बोका पप्पांकडे बघून म्याव म्याव करायला लागला. खरंतर त्याला भूक लागल्यास तो कधीही म्याव म्याव करत नाही.

एका बोक्याची गोष्ट भाग २

लेखक निलम बुचडे यांनी मंगळवार, 14/03/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग २ बर्याच वर्षापूर्वी मी ही गोष्ट लिहायला घेतली होती. ज्या गोष्टीत आमच्याकडे असलेल्या एका बोक्याचा उल्लेख होता. त्यावेळी आमच्याकडे फक्त एकच बोका होता. आज एकूण ६ मांजरे आहेत. आमचा एक बोका सोडला तर इतर ५ मांजरे आम्ही स्वतः आणलेली नाहीत . ती आमच्याकडे कशी आली हे तुम्हाला वाचायला नक्की आवडेल. ही कहाणी मी आता नियमितपणे तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आधीची कहाणी पूर्ण करते, ज्याचा विषय आहे - आमचा बोका... आणि त्याचे बालपण... तर लहानपणी त्याने दूध पचत नसल्याने ६ महिने दुधाला तोंड लावले नव्हते.

मरासिम

लेखक मिडास यांनी सोमवार, 13/03/2017 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला. कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे.

अशी व्हती आमची होळी.....

लेखक इरसाल कार्टं यांनी रविवार, 12/03/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
व्हलीचे पाच दिवस आगोदार व्हलीला सुरवत व्हायची..... गावान जर एकी आसंल त तरणी पोरा एक व्हवून बैलगारी घेऊन रानात लाकरा आनाय जायाची. महामूर लाकरा आसायची म्हून व्हलीचे दिवसापरेत बारकी व्हली पेटायची. व्हलीचे दिवस सांचे ज्याची त्यानी लाकरा बिदीव आनून टाकायची. खरा म्हजे कुर्हाडीन फुटत नसतील आसं लाकराचं वंडं लोखा लय करून व्हलीला दियाची. म एक-दोन बैलगार्या जुपून व्हलीचे खासरान लाकरा पोचती व्हयाची. व्हलीचे दिवस राच्चे 8-9 वात्ता बाया नटून-थटून व्हलीव आरती घेऊन जमा व्हयाच्या. दरम्यान देवलान भजन सुरू असायचा. नंतर भजने भजन करीत-करीत व्हलीव जानार. व्हली पेटवायचा मान मातर गावचे पोलीस पाटलाचाच असायचा.

मुलगी झाली

लेखक शेवटचा डाव यांनी शुक्रवार, 10/03/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या बाहेर मोरीवर बसलो होतो .तोच खट खट बुलेट चा आवाज करीत पांडुभौ आला . त्याच तोंड उतरेल व्हत . "कायर काय झाल पांडुभौ "आर तुझी वहनीची वटी भरली" "काय सांगतुस मग काय करायच ठरवलय तुला ध्यानात हाय ना शेवटाला पुजीच्या अन आर्चीच्या टायमाला शिजर केलय विहनीच " "हो ठाव हायर पण आय काय ऐकणार नाय अस वाटतय " अन मी पुन्हा सिता वहीनीच्या विचारात गुंतलो .आकरा वर्षे झाली पांडुभौ अन सिता वहीनी यांच्या लग्नाला, तशी पांडुभौ अन काकु काका (पांडुभौ चे आई वडील)यांची देखरेख ,शेतीतील कामे, घरात आल्या गेल्याची निट ठेप ,सगळ हसत मुखाने करानारी सिता वहीनी .

ग म भ न ....

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकालधरन॓ माय लय आटवत हुती उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू? आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का, रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल” मी सिकाया गेलो.