एका माणसाची गोष्ट
कथा आणि व्यथा
**************
**एका माणसाची गोष्ट **
शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?"
" हो, तुला कसं कळलं ?"
" असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं.
" बरं तुझी गाडी कोणती ?'
" मॅक्स आहे साहेब "
" टेप ?"
" आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.."
" पण ड्रायवर चांगला का ?"
" एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा"
" अरे...!
मिसळपाव