Skip to main content

संस्मरणीय निसर्ग!

लेखक वर्षा यांनी शनिवार, 15/11/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्‍या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं.

समुद्र...

लेखक veebee009 यांनी शुक्रवार, 14/11/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र...
Taxonomy upgrade extras

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 13/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

निरगाठी...

लेखक नीधप यांनी गुरुवार, 13/11/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
तिने ठरवलंच होतं अंगाखांद्यावर खेळणारा झुरमुर अनुभवांचा गुंताडा, एकदा सोडवायचाच... ती मनाशीच घाबरली. अनुभव दुखावतील वितळून जातील ना.. तसं आवडत होतंच तिलाही अनुभवांच्या झुरमुरीत हरवून जाणं हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. निरगाठींचे चरे मात्र देहामनावर उरले... -नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

दर्शन भारत मातेचे

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 12/11/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वेळी भारतात जायचं म्हटलं की तो दिवस उजाडण्याची उक्तंठा लागून राहिलेली असते. विमानात बसल्यावर वाटतं की किती हळू हळू उडत आहे हा उडन खटारा! भारतात गेल्यावर काय काय करायचं याचे बेत मनात गर्दी करत असतात. घरी गेल्यावर दार कोण उघडेल. आई का भाऊ का वहिणी? आई-वडिलांच्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा, त्यांचे गोंजारणे, पाठीवरुन त्याच मायेने फिरणारा आजीच्या थरथरत्या हाताचा मायेचा स्पर्श, भावंडांच्या भेटीतला आनंद, मध्येच एखाद्या बहिनीचेही पानावलेले डोळे चोरुन पुसणे, "किती मोठी झाली आहे गं तू" असं आईचं तिच्या नातीला लाडानं बोलनं... मन अगदी अधीर होतं देशात पोहचण्यासाठी. तसच मागच्या भेटीतही झालं.

पहिला दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा - ८ नोव्हेंबर २००८

लेखक नंदन यांनी मंगळवार, 11/11/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या शनिवारी ८ नोव्हेंबरला दक्षिण कॅलिफोर्नियातील पहिला मिसळपाव कट्टा - मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचे तर - मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी डांबिसकाका सॅन डिएगो मुक्कामी आले असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हाच मुंबई, पुणे, बंगळूर, जर्मनी, अमेरिकेचा पूर्व किनारा आणि बे एरियातील मिपाकरांप्रमाणेच लॉस एंजेलीस - सॅन डिएगो परिसरातही लवकरच एक कट्टा भरवावा अशी मनीषा पिडांकाकांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मिपावर हाळी देऊन घाटावरचे भट, भाग्यश्री आणि मी यांनी काकांच्या घरी भेटायचं असं ठरवलं.

मनात(च) पूजीन रायगडा!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 10/11/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा गौरीशंकर उभ्या जगाचे, मनात पूजीन रायगडा वसंत बापटांची ही कविता ऐकण्याच्या आधीच रायगडाच्या प्रेमात पडलो होतो. रायगडावर पहिल्यांदा कधी गेलो, ते आठवत नाही. (वय झालं आता!) पण शाळेच्या सहलीतून गेलो नव्हतो, हे नक्की. दोनदा गेलोय, एवढं आठवतं. त्यालाही आता आठ-नऊ वर्षं झाली. लग्नाआधी तिरसटल्यासारखा एकटाच फिरायचो, तेव्हाची ही गोष्ट. "सकाळ'मध्ये रुजू होण्याआधी 30 मे 1999 साली शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, ते मात्र स्पष्ट आठवतंय! तर सांगण्याची गोष्ट ही, की रायगडावर जायचं बरेच वर्षं मनात होतं.