Skip to main content

ती येण्याची चाहूल लागली

लेखक धुमधडाका यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.

थवे फ़ुलले
पक्ष्यांची शाळा भरली
संध्याकाळ बासरीने गुणगुणली
मला ती येण्याची चाहूल लागली

पाणी बेभान थिरकले
डोंगर संधीप्रकाशाने उजळले
दिवसाची घालमेल थबकली
मला ती येण्याची चाहूल लागली

सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली
अंबरात सांज ऊतू गेली
पायवाटांत ओढ भिरभिरली
मला ती येण्याची चाहूल लागली

मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले
डोळे संध्येच्या पंखांनी झाकले
अरुणाने रात्रीला हाक दिली .

मला ती येण्याची चाहूल लागली !!!! मला ती येण्याची चाहूल लागली !!!!

---हे वाचलेलं आवडलं

अशी जर खरचं आली तर स्वागत करीन

धुमधडाक्यात

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1654
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया