घरोघरी तीच………..
सगळ्याच्याच घरोघरी घडणारे नेहमीचे प्रसंग ! फक्त शब्दांत व्यक्त केलेत !
अश्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. कदाचित रटाळहि वाटेल. तरीही लिहिण्याचे धारिष्ट केले
घरोघरी तीच………..
मी ऑफिसला निघालेलो.
आधीच उशीर झालेला
त्यामुळे मी गडबडीत.
ती बाल्कनीत उभी पण माझ्या डोक्यांत फक्त ऑफिस.आणि ऑफिस..
मी गाडीला किक मारतो अन घाईने निघून पण जातो.
ऑफिसांत आल्याआल्या तिचा फोन
"जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” .
ती मला लाडात विचारते " आज काय आहे ? "
" कुठे काय बुवा ! दारारोजचेच रुटीन आणि काय असणार ! "
"काहीच कसं रे लक्षांत नाही राहत तुझ्या ?"
"अगं पण सांग तरी काय ते "
ती गाल फुगवून निघून जाते
मी मख्ख !
मी ऑफिसला जायची तयारी करण्याच्या विचारांत
" पप्पा काहीच कसं लक्षांत नाही हो तुमच्या ?” आज मम्मीचा वाढदिवस नाही का ”?
माझी लगेच ट्यूब पेटते. अरे बापरे ! मी स्वतःला दोष देतो.
सालं आजकाल असं का होते समजत नाही ?
"अगं ऐकल का ? माझी आज सुटी आहे बरं का ! तुझा वाढदिवस नाही का आज “
तिचा प्रतिसाद शून्य !
"आज मस्त संध्याकाळी पिक्चर टाकू अन बाहेरच जेवण करू या “
"आम्हीपण येणार बरं का पप्पा ”
मी खुणेनेच निखील अन सोनुला तिला समजावण्याची खूण करतो
अखेर तिचा रुसवा कमी आणि मी हु ssश्य !
हाच सीन पुन्हा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण !.
माझा वेन्धळेपणा म्हणा किंवा ऑफिसच्या तणावामुळे म्हणा असे प्रसंग कधीतरी घडतातच
तिला गजरा खूप आवडतो अन मी आणायला नेहमीच विसरतो
" तो संतोष पहा. दररोज अगदी न चुकता बायकोसाठी गजरा आणतो अन तुम्ही " ?
"अग आता आपलं काय नवीन लग्न झालय" ?
"पण मी म्हणते गजरा आणण्याचा आणि नव्या जुन्या लग्नाचा काय संबंध? बायको वर प्रेम असावे लागते त्यासाठी “
तिची नेहमीच अपेक्षा असते की नवीन किंवा तिच्या आवडीची साडी नेसली म्हणजे कधीतरी मी म्हणावं
"आज तू खूप छान दिसते ह्या साडीत हं ” !
किंवा कधीतरी म्हणावं
“ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे “.
पण असं बोलणं कधी जमलंच नाही सालं आयष्यात !
आता माझे अन तिचेही केस रुपेरी झालेले ………….
मात्र
सान्निध्यात ती असते तेव्ह्ना काही वाटत नाही ,
नसली तर मात्र ? ? ?
दिवस सरता सरत नाही
अन रात्रीचाही दिवस होतो,
निरंजन वहाळेकर
याद्या
2522
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
आमच्या
मुमु
In reply to आमच्या by पर्नल नेने मराठे
अवांतर :
In reply to आमच्या by पर्नल नेने मराठे
सुंदर!
रटाळ नाही
छान.
अतिशय
मी शुची शी
आधुनिक