माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता.
मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली.
जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती.
थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती.
पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच.
माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले.
कारण..
माझ्याकडे माझे स्वतःचे अॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते.
पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे.
त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोचे अॅड्रेस प्रूफ ह्या दोन कागदपत्रांनुसार माझ्याही अॅड्रेस प्रूफ चा प्रश्न निकालात (!) निघु शकला असता.
पण तिथला अधिकारी माझ्यापेक्षा हुशार निघाला.
त्याच्या नुसार..
तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटनुसार तुम्ही विवाहीत आहात हे सिध्द झाले.
तुमच्या पत्नीच्या अॅड्रेस प्रूफ कागदपत्रानुसार ती अमुक अमुक ठिकाणी राहते हे सिध्द झाले.
पण तुम्ही आणि ती एकत्र राहाताहात ह्याचा कुठालाही पुरावा नाही.
सबब अर्ज फेटाळुन लावण्यात येत आहे.
..
मेंदु मध्ये झिणझिण्या घेऊन मी बाहेर पडलो.
पासपोर्ट ऑफिस मध्ये जायच्या आधी माझा जर अ = ब असेल आणि ब = क असेल तर तर्कशास्त्रानुसार अ = क
ह्या सिध्दतेवर विश्वास होता पण आता अ = ब ह्या गृहितकावरच माझा विश्वास राहीला नाही. !
आता स्वतःच्या अॅड्रेस्-प्रूफसाठी कराव्ह्या लागणार्या द्रविडी प्राणायामाची मानसिक तयारी करतो आहे.
वाचने
4435
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑल दी बेस्ट
फक्त बेंगलोर?
अहो तुम्ही त्याचे (काळ्या)
टेलिफोन
अॅड्रेस्-प्रूफसाठी कराव्ह्या
अधिकार्याचे काय चुकले ते
ओके
In reply to अधिकार्याचे काय चुकले ते by शाहरुख
शहारूखशी सहमत आहे
In reply to ओके by आनंदयात्री
हॅ हॅ हॅ
In reply to शहारूखशी सहमत आहे by पिवळा डांबिस
लोकं जाहीरात करायची एकही संधी
In reply to हॅ हॅ हॅ by आनंदयात्री
लग्नाळू
In reply to लोकं जाहीरात करायची एकही संधी by शिल्पा ब
एम.टी.एन.एल/बी.एस.एन.एल चे
In reply to शहारूखशी सहमत आहे by पिवळा डांबिस
हॅहेहॅ
In reply to एम.टी.एन.एल/बी.एस.एन.एल चे by कानडाऊ योगेशु
डांबीस +१
In reply to शहारूखशी सहमत आहे by पिवळा डांबिस
डांबीस +१
In reply to शहारूखशी सहमत आहे by पिवळा डांबिस
अहो मी कुणाच्याच नावाने बोटे
In reply to डांबीस +१ by अलख निरंजन
पुनर्प्रयत्नसाठी शुभेच्छा! या
सर्व प्रतिसादकर्त्यांचे
अधिकार्यांना नियमांबर हुकुमच
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे by कानडाऊ योगेशु
बंगळुर पासपोर्ट ऑफिसचा माझा
ठाण्यातील पासपोर्ट ऑफिस ग्रेट
In reply to बंगळुर पासपोर्ट ऑफिसचा माझा by अभिज्ञ
+१
In reply to बंगळुर पासपोर्ट ऑफिसचा माझा by अभिज्ञ
बाकी अजुनही आख्खी सिस्टिम
In reply to +१ by छोटा डॉन
>>पण कुणाही अधिकार्याने
In reply to बाकी अजुनही आख्खी सिस्टिम by कानडाऊ योगेशु
पारपत्राचे सोडा, विनोद म्हणजे
In reply to >>पण कुणाही अधिकार्याने by विश्वनाथ मेहेंदळे
आहे खरी गम्मत...
निव्वळ भिकारचोटपणा आहे.
तुमचे वडील हेच तुमचे वडील
In reply to निव्वळ भिकारचोटपणा आहे. by llपुण्याचे पेशवेll
खूप सुधारणा आहे पण इतर प्रॉब्लेम्स आहेतच