Skip to main content

जिजामाता उद्यान कट्टा - वृत्तांत

लेखक वडापाव यांनी रविवार, 26/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर जिजामाता उद्यानात जाण्याची आणि मिपा कट्ट्याला येण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे अनायासे एकाच तिकीटात दोन पक्षी मारायला मिळण्याची आयती संधी चालून आल्यावर ती मी सोडेन कशी?? ठरल्याप्रमाणे मिपा कट्टा सुरळीत पार पडला. त्याच्या वृत्तांताचा एक भाग मी, आणि दुसरा (माहितीपूर्ण) भाग सुंधाशूनूलकर यांनी फोटोंसकट मिपावर टाकायचा, असं ठरलंय!! कट्ट्यातले मी पाहिलेले आणि माझ्या लक्षात असलेले प्रसंग इथे सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. चू.भू.द्या.घ्या. राणीच्या बागेत घरची माणसं फार फार वर्षांपूर्वी गेली होती. त्यांनी मला 'कॅमेरा घेऊन जा' असा सल्ला दिला.

धिस इज द सिस्टीम !

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 25/01/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
'विथ रेफरन्स टु धिस ऑफिस लेटर डेटेड सिक्स्थ डिसेंबर, वी आर टु इनफॉर्म यू दॅट ...' 'बीप बिपीप ...बीप बिपीप..' लँडलाइनच्या आवाजाने मी सेक्रेटरीला देत असलेले डिक्टेशन मधेच खंडित झाले. सकाळपासून मी ते महत्वाचे पत्र कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करीत होते. पण भेटायला येणाऱ्या लोकांच्या एकसारख्या फ्लोमुळे ते काही बेटे मूर्त स्वरूपात येईना. अखेर सेक्रेटरीला बोलावून मी ते पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न चालवला असताना पुन्हा या लँडलाइनने घात केला. 'ओह शिट...हॅलो ?' पहिले दोन शब्द अर्थातच मी रिसिव्हर उचलण्यापूर्वी म्हटले होते.

हिमालय..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 24/01/2014 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय. त्याचं वेड लागतं. नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं. हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं.

भीमनी घंटी

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 23/01/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
" मॅडम, भीमनी घंटी इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज. मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे - तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे. आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं.

बंबईसे आया मेरा दोस्त

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 21/01/2014 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 14/01/2014 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली.

गुलाबाचे फळ

लेखक रम्या यांनी रविवार, 12/01/2014 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात. काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही!

क्षितिजावरले तरंग

लेखक मीराताई यांनी शनिवार, 11/01/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
या खिडकीशी मी असा एकटाच बसलेला असतो.खिडकीचा कट्टा चांगला रूंद आहे. त्यामुळे अंगाचं मुटकुळं करून मला तिथे छान बसता येतं. ही खोली तशी घरातल्या एका बाजूला आणि खिडकी तर आणखीनच एका कोपऱ्यात. त्यामुळे घरात वावरणाऱ्यांना मी दिसत नाही नी मला ते! करायचंय काय म्हणा दिसून तरी! मी बोलतो ते त्यांना पटत नाही अन् ते बोलतात ते मला पटत नाही. घरातले काय न् बाहेरचे काय, माझं बोलणं पटेल असं भोवताली कोणीच दिसत नाही मला. मग बोलायचं तरी कुणाशी? कधीतरी वाटतं एकटा आहे मी, अगदी एकटा! या संपूर्ण जगात माझं असं कुणीच नाही. मी ज्याच्याशी अगदी मन उघडं करून बोलेन, ज्याला ते सगळं कळेल, पटेल, असं कुणी कुणी नाही.

स्थिर अफगाणिस्तान भारताच्या हिताचा

लेखक आतिवास यांनी सोमवार, 06/01/2014 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रसारमाध्यमांत एक विषय चर्चेला असतो – तो म्हणजे ‘अफगाणिस्तानमध्ये काय होणार पुढच्या वर्षी?” यात अनेक उपविषय आहेत. अमेरिकन सैन्य माघारी जाणार का? तालिबानशी शांतता बोलणी होणार का? सत्तेवर कोण येणार? अमेरिका माघारी गेल्यावर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार? भारत काय करणार? भारत अफगाणिस्तानला मदत करत राहणार का? अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा भारताची कुरापत काढणार का? अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा घडणार आहे, त्याला भारताच्या दृष्टीने खरंच काही महत्त्व आहे का? मी अर्थातच अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालिबान, भारताचं परराष्ट्रीय धोरण या विषयांची अभ्यासक नाही.

बसल्यानंतर ची मजा,

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 04/01/2014 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्यानंतर ची मजा, दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात.