Skip to main content

Autism - निदानानंतर..

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी गुरुवार, 13/02/2014 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Autism.. स्वमग्नता.. ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? Autism - लक्षणे व Evaluation ***** Developmental Pediatrician तुम्हाला तुमच्या गोड बाळाच्या थोड्या वेगळ्या वागण्याचे निदान 'स्वमग्नता' असे करतो तो नक्कीच पालकांच्या आयुष्यातील सोप्पा क्षण नसतो. पण हे सुद्धा खरे आहे कि बर्याचदा त्या वेळेस पालकांना काहीएक कल्पना नसते आपले पुढचे आयुष्य कसे असणार आहे?

माझं कोकणातलं गांव :- भाग - १

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 12/02/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
झुकझुक झुकझुक अगीन गाडी,धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहुया, मामाला गावाच्या जावूया || हे गाणं लागलं की कि मनाला खरं तर काकाच्या गावापेक्षा मामाचं गावं (म्हणजे आजोळ) सगळ्यांना जास्त प्रिय असतो हे पटायला लागतं. पण मला मात्र दोन्ही गावे तेवढीच आवडतात. काकाचे गाव म्हणजे आमचेच घर सगळ्यात जास्त आवडते. मला एकुण ८ मामा व एक मावशी (रा. दापोली)त्यापैकी चार गावाकडे राहिले, तर चार कळव्याला माझ्या आई बरोबर रहायला आले, जसजसे लग्न जमत गेले तेव्हा स्वःताहाचे बिर्‍हाड करित गेले. मग त्यांची समवयस्क मुले, मामा, मामी, आणि आम्ही सगळे गावाला कधी जायचे ह्याचे बेत ठरवण्यासाठी आमच्याकडे जमत असत. आम्ही लहान थोर मिळुन सगळेजण १९ जण होतो.(सन १९९५ पर्यंत सगळे उत्सव/ सण आम्ही एकत्र जमुन साजरे करित असु पण आता जमाना बदलला आहे. मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.)

Autism - लक्षणे व Evaluation

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 11/02/2014 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे लेख : पहिला लेख : Autism.. स्वमग्नता.. दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 11/02/2014 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ३

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 10/02/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 ३) मै जानता हू के तू गैर है मगर यूही आठव्या इयत्तेत तुकड्यांची सरमिसळ होवून नवीन तुकड्या बनल्यावर अपर्णा आणि अजित एका वर्गात आलेत. वर्गातील अनेक मुली अजितसाठी नवीन होत्या. मुलींबद्दल खूप आकर्षण वाटावं असंच ते वय होतं. अजितला सुध्दा काही सुंदर मुली आवडू लागल्या. पण हळूहळू इतर मुलींचा विसर पडून फक्त अपर्णाच आवडू लागली. ती सर्वात सुंदर नक्कीच नव्हती. पण आकर्षक होती.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २

लेखक मराठी कथालेखक यांनी गुरुवार, 06/02/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://misalpav.com/node/26930 २) रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 05/02/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल से निकलने वाली रस्ते का शुक्रिया... दिल तक पहुचने वाली हर डगर को सलाम" लता च्या आवाजातल्या या ओळी , "बाली उमरको सलाम" हे गाणं ऐकलं की मन वेगळ्याच विश्वात जातं. अनेक आध्या-अधू-या प्रेमकथा आठवू लागतातं. अनेकदा मनात आलं की या कथा एकदा लिहून काढाव्यात पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. आता ते करावसं वाटतंय. अर्थात कितपत जमेल ते माहीत नाही. पण प्रयत्न करणार आहे. या सगळ्या मी जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. (काही माझ्याही आहेत). सगळ्या अधू-या प्रेमाच्या. यात माझी कल्पनाशक्ती फक्त नावे बदलण्यापुरतीच वापरणार आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 05/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

माझा लोकलनामा :- भाग २

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/02/2014 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लोकलनामा:- भाग १
आपण सारे अर्जुन
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. याच लोकल ने मी ही प्रवास करतो, डब्यात चढलं नी पाठीवरची बॅग रॅकवर ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो, तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात.

पुणे आंतरराष्र्टीय पतंग महोत्सव

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 01/02/2014 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या शनिवारि २५ तरखेला पेपरमधे पतंग महोत्सवाची जहिरात पाहीली.तसा त्याचा आधिपासूनच गाजावाजा चालला होताच,त्यात मिपावर अहमदाबादच्या महोत्सवाचे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर तर महोत्सव मुलांसाठी तरी पहायला हवा असे वाटले.