Skip to main content

असंच थोडं काहीतरी उगीच...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 19/02/2014 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) अमेरिकेत राहून जवळपास सहा महिने होत आलेत. अजून साधारण १५-२० दिवसांनी आमची भारताभूमीकडे परत जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. २००८ मध्ये मी शिकागोमध्ये काही काळ राहिलो होतो; तेव्हा मला माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त एकच मराठी व्यक्ती भेटली होती आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. नाही म्हणायला आमच्याच पुण्याच्या कार्यालयात काम करणारा आणि थोडीशी ओळख असलेला एक मर्द मावळा मराठी माणूस मला पहिल्याच दिवशी दिसला. मी आश्चर्याने हसून त्याला अभिवादन केले.

धिंगाणा बंद

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 18/02/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ७ वर्षांनंतर धिंगाणा डॉट कॉम बंद झाले. प्रेम दिनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा राम राम केला. अनेक मराठी रसिकांचे हक्काचे गाणे ऐकण्याचे ठिकाण बंद झाले. पडद्यामागच्या हालचाली आपल्याला काय माहिती पण स्वप्नील आणि स्नेहल या शिंदे बंधूनी सुरु केलेले आणि भारतात कायदेशीरपणे संगीत ऐकण्याचे हे प्रथम स्थळ होते. मला आठवतंय २००७ मध्ये पुण्यात आय टी मध्ये नवीनच भारती झालेले आम्ही मिट कॉन च्या इमारतीत प्रशिक्षण घेत होतो. सगळेच नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले, वेगवेगळ्या गावातून आणि राज्यांतून आलेले सगळेच जन तसे संगीताचे चाहते होते.

उगाच हळहळते आपली शाई

लेखक नवनाथ पवार यांनी सोमवार, 17/02/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सहावीत असतानाची गोष्ट. मराठीचा तास चालू होता. बाई सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता शिकवत होत्या. सगळ्यांची डोकी बाकावरील पुस्तकांत होती. बाईंचा तसाच आदेश होता. या कवितेच्या पानावर निळ्या हिरव्या रंगातला समुद्र होता. वर्गात फ़क्त बाईंचाच आवाज घुमत होता. शेजारचा मित्र वर्गात असून नसल्यागत. त्याची छान समाधी लागलेली. मागे जरा वळून पाहिलं, मागच्या बाकावरचे पण समाधीत गुंतलेले. बाई कविता शिकवताहेत. मुलं कठीण शब्दांचे अर्थ समासात लिहिताहेत. खिडकीतून येणार्या उन्हाची एक तिरिप कंपासपेटीवर पडलीय. अचानक खट सारखा आवाज येतो अन धपदिशी काहीतरी माझ्या पुढ्यात पडतं. त्या आवाजाने वर्गाची तंद्री भंगते.

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 16/02/2014 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

लेखक रमताराम यांनी रविवार, 16/02/2014 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची, आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची, विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही, तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही, खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती, सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी, दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात, काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड.

ढोल पुण्याचा वाजतो...

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 15/02/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी ढोल म्हटलं की कान न टवकारणारी माणसं क्वचितच भेटतील. त्यातून पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत वगैरे तर नाहीच. त्याची मजा काय आहे, बाज काय आहे, तो रोमांच काय आहे हे अनेकांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे अनुभवलं असेल. विशेषतः गणपतीच्या दिवसात तर अ़ख्खं पुणं ढोल ताशांनी निनादत असतं. तीन वर्षांपूर्वी मी एक दिवस पुण्यावरून ठाण्याकडे येत होतो. अनंत चतुर्दशी चा दिवस होता. स्वारगेटवरून शिवनेरी पकडली होती आणि खिडकीतून ढगाळलेलं संध्याकाळचं आकाश बघता बघता माझा डोळा लागला होता. आणि मग जाग आली ती जाणवणा-या कंपनांमुळे. बसच्या काचेला, सीटला, आणि माझ्या छातीत एक तालबद्ध कंपनं जाणवायला लागली आणि मला जाग आली.

देव आनंद

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 15/02/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 ४) आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.

चिंता

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 13/02/2014 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
असाच आणखी एक प्रवास. रस्त्यावरचं गाव. नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. ते तितकेच महत्त्वाचे असतात. त्यावर बोलत राहतो आम्ही. पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. इथं काही मीटिंग वगैरे नाही. तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड. पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते.